महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बांद्रा पूर्व स्कायवॉक बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय - गैरसोय

बांद्रा पूर्व येथील स्कायवॉक दुरुस्तीकरता बंद करण्यात आला आहे. यामुळे स्कायवॉकखाली असलेल्या अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पालिकेने लावलेला फलक

By

Published : Mar 23, 2019, 2:40 AM IST

मुंबई - बांद्रा पूर्व येथील स्कायवॉक हा अनेक सरकारी कार्यालयांना जोडतो. मात्र, सध्या हा स्कायवॉक दुरुस्तीकरता बंद करण्यात आला आहे. यामुळे स्कायवॉकखाली असलेल्या अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

स्कायवॉक बंद असल्यामुळे नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

सीएनएमटी येथे झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर पालिका सतर्क झाली आहे. पालिकेने अनेक ठिकाणच्या धोकादायक पादचारी पुलाचे काम हाती घेतले आहे. बांद्रा येथील स्कायवॉक हा बांद्रा रेल्वे स्थानक ते बांद्रा न्यायालय तसेच झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाच्या (एसआरए) कार्यालयापासून कलानगर असा पसरला आहे. यातील एसआरए ते कलानगर हा भाग बांद्रा कुर्ला संकुल ते वरळी सागरी सेतू उड्डाणपुलाच्या कामासाठी बंद राहणार आहे. तसेच स्कायवॉकचा उर्वरित भागाची दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशा आशयाचे फलक येथे पालिकेकडून लावण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details