मुंबई : रायगडमधील मुंबई गोवा महामार्गावरील ( Mumbai Goa Highway ) भोगावती नदीपात्रामध्ये जिलेटिनच्या कांड्या ( Gelatin stalks in Bhogavati river ) सापडल्याने, झाले होते. दरम्यान रायगड आणि नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाने ( Bomb Squad ) घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. तर हाती आलेल्या जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्यात आल्या आहेत.
जिलेटीन कांड्या कुठून आल्याचा केला जातोय तपास :मुंबई गोवा मार्गावरील भोगावती नदीपात्रामध्ये गुरुवारी रात्रीच्यावेळेस १० ते १२ जिलेटीन कांड्या आढळून आल्या आहेत. याबाबाबतची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देत परिस्थितीची माहिती घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान येथील मार्गावरील वहातुक एकदिशा मार्गाने सुरू ठेवली असून, रायगड आणि नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून, जिलेटीनच्या कांड्या निकामी करण्यात आल्या आहेत. तर या ठिकाणी आणखी स्फोटके आहेत का? याची खातरजमा करण्यात येत असून, सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलीस यंत्रणेने परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवले :भोगावती नदी पात्रात स्फोटके सापडल्याची माहिती मिळताच परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस यंत्रणेने तात्काळ या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून, पुढील तपास सुरु केला आहे. तर नदी पात्रावरील पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेत जिलेटीन कांड्या ताब्यात घेतल्या आहेत.