मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. बंडखोरांविरोधात शरद पवार यांनी कंबर कसली आहे. राज्य पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. पवार यांना भाजप शासित राज्य वगळता इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनेही पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वाढल्या असताना दुसरीकडे गौतम अदानी यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. गेले अडीच महिन्यात अदानी यांनी तिसऱ्यांदा भेट घेत, विविध विषयांवर खलबत केली. राष्ट्रवादी पक्ष फुटीवरही त्यांनी चर्चा केल्याचे यावेळी समजते.
अदानी पवारांची भेट :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंडेनबर्गच्या अहवालासंदर्भात अदानींविरोधातील जेपीसी चौकशीची मागणी केली. काँग्रेससह भाजप विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे, असे असतानाच शरद पवार यांनी जेपीसीच्या चौकशीला विरोध केला. पवारांच्या विरोधामुळे चांगलीच खळबळ उडाली. तसेच अदानी विरोधातील आक्रमकता कमी होती. त्यानंतर अदानी हे पवारांच्या भेटीला आले. राजकीय वातावरण अदानींनी पवारांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली होती. 1 जूनला अदानी यांनी पवार यांची भेट घेतली. अवघा महिना उलटला असतानाच अदानी पवार यांच्या भेटीला आले. शनिवारी रात्री उशिरा पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेचा फड रंगला आहे.
काँग्रेसमध्ये अस्तित्वाची लढाई :अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटणार केंद्रीय सत्ताधारी पक्ष भाजपचा हात असल्याचे बोलले जाते. अजित पवार यांनीही भाजपसोबत जाण्यासाठी प्रयत्न सुरु होते, याचा दावा केला होता. प्रफुल्ल पटेल यांनी त्याला दुजोरा देत, राजकीय चर्चा वाढवली होती. पटेल यांचे राजकारणातील भाजप नेत्यांशी आणि उद्योग क्षेत्रातील जवळीक, राष्ट्रवादीमध्ये पडलेला खिंडार पवार आणि अदानी यांच्या भेटींमागील हालचाली असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा :