मुंबई - बाजारात लसूण आणि कांदा पिकाची आवक कमी होत आहे. त्यामुळे लसून आणि कांद्याच्या भावात तेजी पहायला मिळत आहे. साध्या लसणाचा भाव १०० ते २०० रुपये तर, किरकोळ बाजारात २०० ते ३०० रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. तसेच, कांद्याचे भाव ५० ते १०० रुपयांपर्यंत आहेत. अतिवृष्टी आणि कमी लागवडीमुळे या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
यावर्षी सुरवातीला लसूण व कांद्याचे दर मागील दोन वर्षांच्या तुलनेने आवाक्यात होत. मात्र, एप्रिलमध्ये व मे मध्ये लागवड कमी झाली. तसेच, पावसाचा तडखा बसल्याने पिकाची नासाडीदेखील झाली. त्यामुळेच भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. मार्च महिन्यात किरकोळ बाजारात लसुण ८० रुपये किलो तर, कांदा ४० रुपये किलो होता. जुलै महिन्यापासून लसणाच्या दरात आणि ऑगस्टपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.