मुंबई- महापालिकेची उद्याने सायंकाळी ७ ते ८ वाजता बंद ठेवण्यात येत होती. मात्र, यापुढे २४ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यावरण आरोग्याच्यादृष्टीने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - कुंभारीतील विडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थांना अकृषिक आकारणीतून सूट
मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा सकारात्मक परिणाम जसा पर्यावरणाच्या दृष्टीने आहे, तसा तो आरोग्याच्यादृष्टीने आहे. मात्र, महापालिकेच्या उद्यान खात्याच्या अखत्यारितील उद्याने खुल्या राहण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तर काही उद्यानांची सायंकाळी बंद होण्याची वेळ ७ ते ८ च्या दरम्यानची होती. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना हवा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने २४ तास खुली ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अखत्यारितील जागांचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळांचे वेळापत्रक उद्यानांच्या प्रवेशद्वाराजवळ लावले जाणार असल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
हेही वाचा - एमआयएमसोबत आमची युती कायम - अॅड. प्रकाश आंबेडकर