महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गँगस्टर एजाज लकडावालाला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी - मुंबई गुन्हे बातमी

गँगस्टर एजाज लकडावाला याला काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी बिहारच्या पाटणामधून अटक केली आहे. त्याच्यावर मुंबई शहरात फक्त खंडणीचे एकूण 26 गुन्हे असल्याचे समोर आले आहे.

r Ejaz Lakhdawala holds court till January 27
लकडावालाला 27 जानेवरीपर्यंत न्यायालयीन कोठडी

By

Published : Jan 21, 2020, 8:00 PM IST

मुंबई- खंडणी आणि इतर अनेक प्रकारचे असंख्य गुन्हे असणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एजाज लकडावालाला 27 जानेवरीपर्यंत न्यायालयीन कोठडी

हेही वाचा - कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

गँगस्टर एजाज लकडावाला याला काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी बिहारच्या पाटणामधून अटक केली आहे. त्याच्यावर मुंबई शहरात फक्त खंडणीचे एकूण 26 गुन्हे असल्याचे समोर आले आहे. एजाज लकडावाला याला मागच्या वेळी न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यामध्ये बांद्रामधल्या एका बिल्डरला खंडणीसाठी धमकवल्याचे हे प्रकरण होते. या प्रकरणात न्यायालयाने त्याला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, खंडणी विरोधी पथकाकडून त्याला आणखी दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये अटक दाखवण्यात येणार असून उद्या (बुधवारी) पुन्हा पोलीस कोठडीसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा - मुंबईत अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई

लकडावाला सध्या मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात असून त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. त्याचबरोबर त्याचे अंडरवर्ल्ड जगताशी असणारे सबंध आणि त्याच्या चौकशीमधून आणखी काही मोठे धागेदोरे मिळतात या यासाठीसुद्धा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details