महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gangster Ejaz Lakdawala: गँगस्टरला जेलमध्ये हवी मच्छरदाणी, कोर्टात सादर केली डासांनी भरलेली बाटली! - एजाज लकडावाला

गँगस्टर एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याने कारागृहात डासांपासून वाचण्याकरिता मच्छरदाणीची मागणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात केली होती. (Ejaz Lakdawala demanded mosquito net in jail). मात्र न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावली आहे.

गैंगस्टर एजाज लकडावाला
Ejaz Lakdawala demanded mosquito net in jail

By

Published : Nov 4, 2022, 10:41 PM IST

मुंबई:गँगस्टर एजाज लकडावाला नवी मुंबईतील तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याने कारागृहात डासांपासून वाचण्याकरिता मच्छरदाणीची मागणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात केली होती. (Ejaz Lakdawala demanded mosquito net in jail). मात्र न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावली आहे. कारागृहातील मच्छराचे प्रादुर्भाव वास्तविक न्यायालयासमोर दाखवण्याकरिता मेलेल्या मच्छर बॉटलमध्ये टाकून न्यायाधीशांसमोर दाखवले गेले होते.

मेलेल्या डासांनी भरलेली प्लास्टिकची बाटली आणली: गँगस्टर एजाज लकडावाला याने तुरुंगातील कोठडीतील आपली परिस्थिती अधोरेखित करण्यासाठी मेलेल्या डासांनी भरलेली प्लास्टिकची बाटली न्यायालयात आणली होती. मात्र त्यानंतरही त्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. फरारी गुंड दाऊद इब्राहिमचा माजी सहकारी असलेला लकडावाला वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत खटले आहे. लकडावाला याला जानेवारी 2020 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

पोलीसांकडून विरोध: पोलिसांकडून आरोपीला मच्छरदाणी देण्यासाठी विरोध करण्यात आला. डासांपासून बचाव करण्यासाठी आरोपी ओडोमॉस आणि अन्य उपाय वापरू शकतात असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वीही लकडावालाला एक मच्छरदाणी देण्यात आली होती, मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे पोलिसांनी ती काढून घेतली होती.

मच्छरदाणीचा गैरवापर होऊ शकतो:यापूर्वी एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींनीही कारागृहात मच्छरदाणी मिळण्यासाठी याचिका केली होती, मात्र त्यावेळीही कारागृह प्रशासनाने त्यांची याचिका नामंजूर केली होती. गँगस्टर डी. के. रावसह अन्य काही जणांना यापूर्वी अन्य एका न्यायालयाने मच्छरदाणी वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र आता आरोपींना सहसा अशी परवानगी दिली जात नाही. मच्छरदाणीचा गैरवापर होऊ शकतो अशी शक्यता कारागृह प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details