मुंबई : विलेपार्लेत राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेवर तिच्या मित्रासह इतर आरोपींनी अहमदाबाद येथे सामूहिक बलात्कार (Woman Gangrape in Ahmadabad) केल्याची खळबळ घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या (Gangrape Accused Arrested In Mumbai) आहेत.
अन्य आरोपीचा शोध सुरू :अटक दोन आरोपींपैकी लालासाहेब या आरोपीला पीडित महिला ओळखत असल्याचे पोलिसांनी माहिती दिली. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दोन आरोपींना अटक :विलेपार्ले येथे राहणाऱ्या विवाहित महिलेवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, महिलेवर गुजरातमधील अहमदाबाद येथे अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लालासाहेब सुखनाथ यादव आणि शशांक संजय सावंत अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यात ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या दोन्ही आरोपींचा राजपूत नावाच्या तिसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या तिघांविरुद्ध सामूहिक बलात्कार, विनयभंग आणि धमकी दिल्याच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कशी घडली घटना ? ४९ वर्षीय पीडित महिला तिच्या पतीसह मुलांसोबत विलेपार्ले परिसरात राहते. आरोपी लालासाहेब कांदिवली परिसरात राहत असून तो तिचा जवळचा मित्र आहे. ते दोघेही गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अनेकदा पत्ते खेळण्यासाठी लालासाहेब तिच्या विलेपार्ले येथील राहत्या घरी येत होता. शुक्रवारी ६ जानेवारीला त्याने तिला जुगार खेळण्यासाठी आपल्याला अहमदाबाद येथे जायचे आहे, असे सांगून कारमध्ये बसविले. यावेळी त्यांच्यासोबत इतर दोन आरोपी होते. अहमदबाद येथे गेल्यानंतर ते सर्वजण एका सदनिकेत वास्तव्यास होते. तिथेच त्यांनी मद्यप्राशन केले होते.
जुने फोटो दाखवून बलात्कार :मद्यप्राशनानंतर पीडित महिलेला लालासाहेबने तिचे काही जुने फोटो दाखवले. ते फोटो दाखवून त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याच्या इतर दोन मित्रांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा विनयभंग केला. ते सर्वजण ७ जानेवारीला मुंबईत परत आले. घडलेली आपबिती तिने तिच्या पतीला सांगितली आणि नंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. विलेपार्ले पोलिसांना अहमदाबाद येथे घडलेला प्रकार सांगून तिने तिन्ही आरोपींविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर लालासाहेब यादव आणि शंशाक सावंत या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.