मुंबई - सीएसएमटी येथे गुरुवारी पादचारी पूल कोसळला. त्या घटनेत पुलावर गेले १५ वर्ष केळे विक्री करणारा ३२ वर्षीय विक्रेता जखमी झाला आहे. आत्माराम येडगे असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीएसएमटी दुर्घटना: केळी विक्रेत्याचे कुटुंब येणार उघड्यावर - गंगाराम कळापे
सीएसएमटी येथे गुरुवारी पादचारी पूल कोसळला. त्या घटनेत पुलावर गेले १५ वर्ष केळे विक्री करणारा ३२ वर्षीय विक्रेता जखमी झाला आहे. त्यामुळे त्यांची बायको आणि २ मुलांचे आता काय होणार? असा प्रश्न जखमी केळे विक्रेतेचे मेव्हणे गंगाराम कळापे यांनी उपस्थित केला आहे.
जखमी व्यक्तीचे नातेवाईक
आत्माराम हे दुर्घटनाग्रस्त पुलावर दररोज संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत केळी विकत असत. कालच्या घटनेत ते पुलावरून खाली कोसळले आणि यात त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांची बायकोआणि २ मुलांचे आता कायहोणार? असा प्रश्न जखमी आत्मारामचे मेव्हणे गंगाराम कळापे यांनी उपस्थित केला आहे.