लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या सचिवांची प्रतिक्रिया मुंबईGaneshotsav 2023 :मुंबईसह देशातील प्रसिद्ध अशा 'लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा' अशी ख्याती असलेल्या या दोन मंडळांनी भाविक, कार्यकर्ते आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती तसंच मूर्तीवरील सोन्याचे दागिने आणि एकंदरीतच विसर्जनाच्या मूर्ती दरम्यान विमा काढलेला आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने मुंबईचा राजासाठी साडेपाच कोटींचा तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साडे सव्वीस कोटींचा विमा उतरवला आहे, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलीय.
भाविकांची घेतली जाते काळजी :लालबाग परिसरात गणेशोत्सवादरम्यान दरदिवशी दहा लाखांचा जनसमुदाय उसळलेला असतो. या काळात कार्यकर्त्यांसह भाविकांना कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून साडेपाच कोटी रुपयांचा विमा उतरवल्याची माहिती मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलीय. स्वप्निल परत यांनी पुढे सांगितलंय की, मंडपात असलेली भव्य गणपती बाप्पाची मूर्ती आणि मूर्तीवरील दागिने, कार्यकर्ते आणि असंख्य येणारे भाविक तसंच पार ब्रिगेड आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही घटना घडल्यास हा साडेपाच कोटींचा विमा उतरवण्यात आलाय. मात्र, विघ्नहर्ता बाप्पाच्या या उत्सवात अशी विघ्ने मुळात येतच नाही. मात्र, पूर्वकाळजी म्हणून मंडळानं पुढाकार घेऊन हा विमा उतरवलेला (Ganeshotsav 2023 insurance) आहे.
साडे सव्वीस कोटींची पॉलिसी : त्याचप्रमाणे 'लालबागचा राजा' अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवमंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय की, मंडळाने साडे सव्वीस कोटींचा विमा यावर्षी उतरवलेला आहे. तसेच मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितलंय की, दि न्यू इंडिया इंश्युरन्स कंपनी लिमिटेडकडून साडे सव्वीस कोटींची पॉलिसी काढण्यात आलीय. 24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीसाठी हा विमा उतरवण्यात (Mumbai Raja Mandal insurance) आलाय.
'असा' उतरवला विमा :सेट, प्रॉपर्टी इलेक्ट्रीकल फिटिंग्स सर्व मुख्य मंडप आणि प्रवेशद्वारासाठी अडिच कोटी, तृतीय पक्ष जोखीम, प्रसादाच्या माध्यमातून विषबाधा यासाठी पाच कोटी तर व्यक्तीगत दुर्घटना (भाविक सहकारी सभासद, कार्यकारणी (रजिस्टर), रहिवाशी, सिक्युरिटी गार्डस, वॉचमॅन व इतर विभागीय कामगार यांच्यासाठी बारा कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आलाय. हा विमा उत्सवापासून ते मुर्ती विसर्जनपर्यंत चालू असणार आहे. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाच्या अंगावरचे दागीने आणि मौल्यवान वस्तू (विमा लाभ उत्सवापासून ते मूर्ती विसर्जन आणि परत आणण्यापर्यंत विमा लाभ चालू राहिल) यासाठी सात कोटी चार लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे, अशी माहिती बाळासाहेब कांबळे यांनी (Lalbagh Raja Mandal insurance) दिलीय.
हेही वाचा :
- Ganeshotsav 2023: गणपती बाप्पा मोरया! पाहा, ढोल ताशांच्या गजरात वृंदावनच्या राजाचं ठाणे नगरीत जल्लोषात स्वागत
- King Of LOC : 'सीमेच्या राजा'ची स्वारी जम्मू काश्मीरच्या दिशेनं रवाना, बाप्पा लवकरच पोहोचणार सीमेवर!
- Ganeshotsav २०२३ : ठाण्यातील गणेश मूर्ती पोहोचल्या विदेशात; मुख्यमंत्र्यांच्या गणेश मूर्तींवर फिरवला जातोय शेवटचा हात