महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganeshotsav २०२३ : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी; राज्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन - गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी

Ganeshotsav २०२३ :राज्यात यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे (Internation Ganesh Festival 2023) आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटनाला (Tourism) चालना देत पारंपारिक कला आणि संस्कृतीची ओळख देश-विदेशातील पर्यटकांना करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचं शासनाकडून सांगितलं जात आहे.

Ganeshotsav २०२३
आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 7:57 AM IST

मुंबई :Ganeshotsav २०२३ : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाच आगमन १९ सप्टेंबर (Ganesh festival 2023)रोजी होत आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुंबईत सुद्धा विविध सार्वजनिक मंडळाद्वारे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मोठ मोठ्या आकर्षक विविध रूपी रंगीत मूर्ती व विसर्जन सोहळा याचे देश विदेशातील पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण असते. त्याच कारणाने राज्यातील पर्यटनाला गणेशोत्सवा दरम्यान चालना देण्यासाठी यंदा प्रथमच राज्यात 'आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे' (Internation Ganesh Festival 2023) आयोजन करण्यात आले आहे.



पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख : महाराष्ट्रात तसेच मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव हा देश विदेशात प्रसिद्ध आहे. याच कारणाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्याबरोबर आपल्या पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख देश-विदेशातील पर्यटकांना करून देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन (International Ganesh Festival In Maharashtra) करण्यात आले आहे. तसेच या गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी देऊन राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनाद्वारे दिनांक १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



महाराष्ट्राची कला व सांस्कृतिचा वारसा:या विषयावर बोलताना पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले आहेत की, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला गणेशोत्सव हा केवल मर्यादित आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध नसून तो महाराष्ट्राची कला व सांस्कृतिचा वारसा जपण्याबरोबर येथील लोकांचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे माध्यम आहे. याच कारणाने आम्ही आपली पारंपरिक कला व संस्कृती ठेवा गणेश महोत्सवाच्या माध्यमातून जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.



गेटवे ऑफ इंडिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम : या गणेश महोत्सवाअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India) येथे गणेशाच्या विविध स्वरूपांवर केंद्रित विशेष सांस्कृतिक केंद्राची उभारणी, वाळू शिल्प, मौझेक आर्ट, स्क्रोल आर्टचे प्रदर्शन गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शनच्या तसेच मॅपिंगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राची परंपरा, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी वारली कलेची कार्यशाळा, विविध कारागीराद्वारे निर्मित हस्तकला वस्तूंचे कलादालन, महाराष्ट्र पारंपारिक कला आणि लोककला संस्कृती दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी. १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर असे दहा दिवसीय गणेशोत्सव महोत्सवाअंतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.

पर्यटकांना महाराष्ट्राच्या महोत्सवामध्ये आमंत्रित :याबाबत बोलताना पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी म्हणाल्या की, गणेशोत्सव हा सण म्हणजे पारंपरिक व आधुनिक उत्सवाच्या संगमाशी सामील होण्याचा जगाला संकेत देतो. आंतरराष्ट्रीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि सांस्कृतिक जाणकार यांना महाराष्ट्राच्या विशाल आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी होण्यास आमंत्रित करण्याचा आमचा उद्देश आहे.

हेही वाचा -

  1. Shivkalin Mardani Khel: शिवकालीन मर्दानी खेळांचे गणेशोत्सवात वाढलं आकर्षण; जाणून घ्या खेळांच्या इतिहासासह फायदे
  2. Ganeshotsav २०२३ : गणपती बाप्पासाठी कोल्हापुरी फेट्यांची मागणी वाढली, बाप्पासाठी सर्वात मोठा फेटा
  3. Ganeshotsav २०२३ : रायगडावरील दिमाखदार मेघडंबरीत विराजमान ‘लालबागचा राजा’; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details