माहिती देताना युवा मूर्तिकार ऋषिकेश जाधव मुंबई : गणेश चतुर्थीला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून, त्याची लगबग सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. तर मुंबईतील विविध गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये गणपतीच्या मुर्त्यांना सजवण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये उत्तर भारतातून आलेल्या हजारो कारागिरांचा समावेश असून, गणपती उत्सवाच्या निमित्त या बेरोजगारांना कामाची संधी दरवर्षी प्राप्त होते. (Ganeshotsav 2023)
असंख्य रोजगाराच्या संधी: महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबरला होत आहे. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या आगमनासोबत भक्तांसाठी असंख्य रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देत असतो. मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान या व्यवसायात होणारी गुंतवणूक ही हजारो करोडोंची असते. अशात मुंबईतील गणेश कारखान्यात विविध रूपातील गणपती मूर्ती साकारण्याचे काम जोरात सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान थोरांपासून पासून मोठे कारागीर हे मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. राज्यातील तसेच मुंबईतील मूर्तीकारांची संख्या पाहता त्यामध्ये उत्तर भारतातून विशेष करून युपी, बिहार मधून मुंबईत येऊन गणपती कारखान्यात काम करणाऱ्या कारागिरांची संख्या जास्त आहे.
यंदा सरकारने मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठवल्या कारणाने गणेशोत्सव अतिशय आनंदात साजरा होणार आहे. गणेश मूर्ती कारखान्यात उंचच्या उंच विविध रूपातील गणपती साकारण्याची स्पर्धा सुरू आहे. - ऋषिकेश जाधव, युवा मूर्तिकार
परराज्यातील कामगारांना काम : कोविडचे दोन वर्ष सोडले तर मागील 17 वर्षापासून गणपतीच्या मूर्ती साकारण्यासाठी मुंबईत अनेक कलाकार येतात. यात गणेश मूर्ती कारखान्यात काम करण्यासाठी येणारे उत्तर प्रदेशचे 57 वर्षीय शिवानंद शर्मा सांगतात की, मागील 17 वर्षे ते सातत्याने मुंबईमध्ये कारखान्यात काम करत आले आहेत. आता त्यांना या कलेची इतकी आवड झाली आहे की, दरवर्षी न चुकता ते गणेशोत्सवात मुंबईत येतात. सुरूवातीला या क्षेत्रात ते नवीन असल्याने त्यांना या कामाबाबत इतकी माहिती नव्हती. परंतु आता ते या कामात पूर्ण तरबेज झाले आहेत. त्याच बरोबर कालानुसार या कामात होणारे बदल सुद्धा त्यांनी अनुभवले आहेत. गणपतीचे नाही तर त्यानंतर येणाऱ्या नवरात्री उत्सवासाठी सुद्धा देवीच्या मुर्त्या साकारण्याचे ते काम करतात.
मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठवल्याने आनंद : यंदा सरकारने मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठवल्या कारणाने गणेशोत्सव अतिशय आनंदात साजरा होणार आहे. या निर्णयाने मोठा आनंद मूर्तीकारांत पसरला आहे. मुंबईतील गणेश मूर्ती कारखान्यात दिवस-रात्र काम सुरू असून, याबाबत मूर्तीकारांनीही समाधान व्यक्त केले आहे. मुंबईतील गणेश मूर्ती कारखान्यात उंचच्या उंच विविध रूपातील गणपती साकारण्याची स्पर्धा सुरू आहे.
हेही वाचा -
- Eco Friendly Ganesha Idol : पुण्यातील पेटंट मिळविणारे पहिले शिल्पकार; पेटंटला दिले 'रवींद्र मिश्रण' नाव...
- Ganeshotsav 2023: पुण्यात गणेश मंडळाच्या देखाव्याची लगबग सुरू, यावर्षी 'हा' देखावा असणार विशेष आकर्षण
- Ganeshotsav 2023 : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! सरकारने गणेशोत्सवावरील निर्बंध उठवले