मुंबई -देशासह संपूर्ण राज्यात जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. १० दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर आज (गुरुवारी) सर्व भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबईतील लागबाग मंडळाचे कार्यकर्तेही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गणेशोत्सव 2019 : मुंबईतील लालबाग मंडळ 'राजाला' निरोप देण्यासाठी सज्ज - बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास या लालबागचा राजा गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पाहूया ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा घेतलेला आढावा...
हेही वाचा -गणपती विसर्जनासाठी मुंबई पालिका सज्ज ; ६९ नैसर्गिक स्थळे, ३२ कृत्रीम तलावांची सोय
या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नृत्य आणि जल्लोष करताना दिसत आहेत, गुलाल उधळत आहेत. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास या लालबागचा राजा गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पाहूया ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा घेतलेला आढावा...