महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अरबी समुद्रात विसावला - bhakt say bye to Lalbagcha raja

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही राजाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.

गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागच्या राजा अरबी समुद्रात विसावला

By

Published : Sep 13, 2019, 10:30 AM IST

Updated : Sep 13, 2019, 12:15 PM IST

मुंबई - गणपती बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात मुंबईतील नवसाला पावणारा गणपती म्हणजे लालबागच्या राजाचे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आज (शुक्रवारी) सकाळी साडे आठच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. १० दिवसाच्या गणेशोत्सवानंतर गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी १० वाजताच्या आरतीनंतर राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. दरम्यान तब्बल २२ तासानंतर लालबागच्या राजाचे आज विसर्जन करण्यात आले. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी देखील उपस्थित होता.

गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अरबी समुद्रात विसावला

हेही वाचा -पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच मुख्यमंत्र्यांनी केले गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही राजाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. तर पहाटे 5.30 दरम्यान लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटी येथे पोहोचली. यावेळी मोठा जनसागर राजाला निरोप देण्यासाठी आला होता. यावेळी लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.

Last Updated : Sep 13, 2019, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details