महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवईतील गणेश मंडळाने भरले, होतकरु विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क - मुंबई बातमी

कला विकास मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवित वारसा जपण्याचे काम करीत असते. परिसरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या समाजमंदिरात मोफत वृत्तपत्र वाचनालय, संगणक वर्ग, दहावी-बारावीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन शिबीर, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवणार असल्याचे मंडळाचे सदस्य दिनेश गाडे यांनी सांगितले आहे.

पवईतील गणेश मंडळाने भरले, होतकरु विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क

By

Published : Sep 12, 2019, 4:16 AM IST

मुंबई- पवईतील कला विकास मंडळाने यावर्षी पवई परिसरातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क भरुन सामाजिक वारसा जपण्याचे काम केले आहे. यावेळी मंडळाचे 45 वे वर्ष आहे. मंडळ गेले दोन वर्षांपासून हा उपक्रम गणेशोत्सव काळात खर्चात बचत करत राबवत आहे.

मंडळाचे सदस्य दिनेश गाडे

हेही वाचा-सीएसटीएम परिसरात ओणम निमित्त काढण्यात आली मनमोहक रांगोळी

कला विकास मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवित वारसा जपण्याचे काम करीत असते. परिसरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या समाजमंदिरात मोफत वृत्तपत्र वाचनालय, संगणक वर्ग, दहावी-बारावीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन शिबीर, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवणार असल्याचे मंडळाचे सदस्य दिनेश गाडे यांनी सांगितले आहे.

तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, म्हणून त्यांचे शालेय शुल्क, शालेय साहित्य देऊन मदत मंडळ करत आहे. गेल्या वर्षी मंडळाने पवईतील ज्ञानमंदिर विद्यालय, पवई इंग्लिश हायस्कूल, पवई मराठी शाळा या तीन शाळातील 250 गरजू विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क भरले होते. या वर्षी हा आकडा मंडळाने वाढवण्याचा मानस केला. आणि जमेल तेवढे देणगी व वर्गणी जमा करुन समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने या मंडळाने यावर्षी ज्ञान मंदिर शाळा, पवई इंग्लिश हायस्कूल, पवई मराठी शाळा यातील गरजू व होतकरू 350 विद्यार्थ्यांची 6 लाख 50 हजार रुपये शालेय शुल्क शाळेमध्ये चेकद्वारे जमा केले.

यंदाच्या वर्षी कला विकास गणेश मंडळाने बाप्पाच्या सजावटीच्या माध्यमातून दूर अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या व तेथूनच ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे अजरामर समरगीत लिहिणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनपट असणारा देखावा साकारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details