मुंबई- महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत आयोजित 'श्री गणेश गौरव पुरस्कार' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर बंगल्यावर जाहीर केला. त्यात माझगांव येथील ताराबाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांला प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले.
मुंबईतील गणेश गौरव पुरस्कार जाहीर; माझगांवच्या ताराबाई गणेश मंडळाला प्रथम पारितोषिक - विश्वनाथ महाडेश्वर
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी या पुरस्कारांचे ३२ वे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेत मुंबईमधील ७१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली. दोन टप्प्यात या सर्व मंडळांचे परीक्षण केले गेले.
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी या पुरस्कारांचे ३२ वे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेत मुंबईमधील ७१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली. दोन टप्प्यात या सर्व मंडळांचे परीक्षण केले गेले. त्याचा निकाल महापौर यांनी जाहीर केला. याप्रसंगी उप आयुक्त व गणेशोत्सव समन्वयक नरेंद्र बरडे तसेच स्पर्धेचे परीक्षक मंडळ उपस्थित होते. या स्पर्धेमधील पुरस्कारप्राप्त मंडळांना रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाते.