महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

LIVE बाप्पा मोरया ! राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; वाजत-गाजत बाप्पांचं आगमन - श्रावण

आज राज्यभरात सर्वत्र बाप्पाच्या मूर्तींची वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. चला तर मग आमच्या माध्यमातून पाहुयात राज्यभरात विविध गणेश मंडळांची प्रतिष्ठपना...

मोरया

By

Published : Sep 2, 2019, 10:20 AM IST

Updated : Sep 2, 2019, 1:46 PM IST

नागपूर- सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवाचा पहिल्या दिवशी सकाळीच मंत्रोपचार आणि विधीवत पूजा करून नागपूरच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भाविक-भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. - वाचा सविस्तर

  • पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक सुरू झाली आहे. बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरातून सुरू झाली आहे. आप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता या मार्गे बाप्पाची मिरवणूक उत्सव मंडपाकडे रवाना झाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. - वाचा सविस्तर

  • मुंबई- अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारीदेखील करण्यात आली आहे. - वाचा सविस्तर

  • मुंबई - काल रात्रीपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. विशेष म्हणजे, सिद्धिविनायक मंदिरात हजारो फुलांनी मंदिराची सजवाट केली आहे. तर, दिवसभरात देशातील लाखों भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज ट्रस्टने व्यक्त केला आहे. चतुर्थी असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त बप्पाच्या दर्शनासाठी मुंबई मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर

  • मुंबई - महाराष्ट्रासह शेजारील राज्यांसाठी खास आकर्षण असणाऱ्या लालबागच्या राजाचं live दर्शन, थेट मुंबईवरून - येथे पाहा
    लालबागचा राजा
  • मुंबई - श्रावण महिना संपत आला, की सर्वांना वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाची. आज गणेश चतुर्थी म्हणजे आजच्याच दिवशी बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. आज राज्यभरात सर्वत्र बाप्पाच्या मूर्तींची वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. चला तर मग आमच्या माध्यमातून पाहुयात राज्यभरात विविध गणेश मंडळांची प्रतिष्ठपना...

    Last Updated : Sep 2, 2019, 1:46 PM IST

    ABOUT THE AUTHOR

    ...view details