महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganesh Festival 2023 : दरवर्षी सजावट करणाऱ्या नितीन देसाईंचा पडला नाही विसर... लालबागचा राजा मंडळ वाहणार अनोखी श्रद्धांजली - Mumbai ganpati Festival news

Ganesh Festival : मुंबईतील प्रसीद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून करोडो भाविक येतात. ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई हे गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचा देखावा साकारत होते. मात्र, नितीन देसाई यांचा मृत्यू झाल्यामुळे लालबागचा राजा मंडळाकडून नितीन देसाई यांना अनोखी श्रद्धांजली देण्यात येणा आहे. तसेच इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आणि लहान मुलांना अनोखी मदत करण्यात येणार असल्याचे लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात आलयं.

लालबागचा राजा मंडळ
Ganesh Festival

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 5:42 PM IST

मुंबई Ganesh Festival : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलायं. गणेशोत्सवात मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी भाविक येतात. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 90वे वर्ष असून, यावर्षी देखाव्यात रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली जातेय. गेल्या अनेक वर्षांपासुन ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई हे लालबागच्या राजाचा देखावा साकारत होते. मात्र, यंदा नितीन देसाई यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 19 तारखेला अनोख्या पद्धतीने नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेयं. (Mumbai Lalbagcha Raja)

नितीन देसाई स्वतः साकारायचे देखावा : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई हे निस्सीम गणेशभक्त होते. ते दरवर्षी स्वतः हजर राहून लालबागच्या राजाचा देखावा साकारायचे. यंदा देखील लालबागच्या राजाचे पाद्यपूजन नितीन देसाई यांच्या हस्ते पार पडलं. मात्र, नितीन देसाई यांच्या दुख:द निधनाने लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लालबागच्या राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओत जात नितीन देसाईंचे अंतिम दर्शन घेतले होते.


नितीन देसाईंना वाहणार अनोखी श्रद्धांजली : यंदा लालबागच्या राजाचे नव्वदावे वर्ष आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या मंडपात असलेल्या 12 मोठ्या स्क्रीन, आठ ते दहा एलईंडीवर नितीन देसाई यांच्यावर आधारित व्हिडिओ दिवसभर प्रसारित करण्यात येणार आहेत. यापद्धतीने बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी नितीन देसाई यांची आठवण काढून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केलं जाणार आहे.


इर्शाळवाडीच्या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावला लालबागचा राजा : मुसळधार पावसामुळे दरड कोसळून संकट सापडलेल्या इर्शाळवाडीकरांसाठी लालबागचा राजा मदतीसाठी धावून आलायं. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अनेक समाज उपयोगी उपक्रम कार्यक्रम नेहमीच राबवले जातात. इर्शाळवाडी येथे घटनास्थळी जाऊन लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला होता. 27 सप्टेंबरला लालबागच्या राजाच्या मंडपात होणाऱ्या पान सुपारी कार्यक्रमादरम्यान इर्शाळवाडीतील अनाथ झालेल्या 22 मुलांना आणि दुर्घटनाग्रस्त 43 कुटुंबांना प्रत्येकी 50 हजारांचे धनादेश देण्यात येणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आणि लहान मुलांना सामाजिक भान राखून मदतीचा हात देऊन खारीचा वाटा उचलण्याचे काम करण्यात आले असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचा :

  1. Ganeshotsav 2023: आला रे आला बाप्पा आला! गणरायाच्या आगमनाचा मुंबईत जल्लोष; 'या' बाप्पांचे आज होणार आगमन
  2. Mumbai Goa Highway Starts : कोकणवासीयांना खुशखबर, गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्ग सुरू
  3. Nitin Desai News :लालबागच्या राजाला मृत्यूपूर्वी देसाईंनी केला अखेरचा नमस्कार... ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांकडे काय केली मागणी?

ABOUT THE AUTHOR

...view details