महाराष्ट्र

maharashtra

गांधी शांती यात्रेला मुंबईतून सुरुवात; सहाहून अधिक राज्यातून जाणार यात्रा

By

Published : Jan 9, 2020, 1:41 PM IST

'गेट वे ऑफ इंडिया' येथे आज गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर, तृणमूल काँग्रेसचे नेते, शांती मार्चाे यात्रेला उपस्थित होते. ही यात्रा देशातील सहाहून अधिक राज्यातून जाणार असून 30 जानेवारी रोजी दिल्लीतील राजघाट येथे समारोप होणार आहे.

gandhi-shanti-yatra-begins-from-mumbai
gandhi-shanti-yatra-begins-from-mumbai

मुंबई - देशाला एकसंघ ठेवण्यासाठी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान दिले. त्या संविधानाचे रक्षण आम्हाला करायचे आहे. आम्हाला या देशाची पुन्हा फाळणी होऊ द्यायची नाही. गांधींची हत्याही पुन्हा होऊ द्यायची नाही. आम्ही सर्व एक असून एकच राहणार आहोत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केले. मोदी सरकारने आणलेल्या सीएए, एनआरसी आणि एनसीआर कायद्याच्या विरोधात आज मुंबईतून 'गांधी शांती यात्रा' सुरू करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

गांधी शांती यात्रेला मुंबईतून सुरुवात

हेही वाचा-जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर.. पाहा, कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?

'गेट वे ऑफ इंडिया' येथे आज गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर, तृणमूल काँग्रेसचे नेते, शांती मार्चाे यात्रेला उपस्थित होते. ही यात्रा देशातील सहाहून अधिक राज्यातून जाणार असून 30 जानेवारी रोजी दिल्लीतील राजघाट येथे समारोप होणार आहे. या यात्रेच्या दरम्यान केंद्र सरकारच्या सीएए, एनआरसी आणि एनसीआर कायद्याच्या विरोधात जनमत तयार केले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांवर केंद्र सरकारच्या विरोधात व्यापक लढा उभा केला जाणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या सीएए, एनआरसी आणि एनसीआर या कायद्याच्या विरोधात आमची गांधी शांती मार्च यात्रा आहे. केंद्राच्या या कायद्याच्या अंमलबजावणीत जे सरकारे सामील आहेत. त्यांच्या विरोधात ही यात्रा आहे. मोदीने सरकार आडून देशाची फाळणी करण्याचे कारस्थान सुरू केले असून आम्ही पुन्हा देशाची फाळणी होऊ देणार नाही, या देशात पुन्हा गांधींची हत्याही होऊ देणार नाही, असेही सिन्हा म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शांती यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी केलेल्या भाषणात मोदी-शहा यांच्या विरोधात जोरदार निशाणा साधला. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली त्यावरून भारतीय समाजात एक मोठी अशांतता निर्माण झाली आहे. सीएए, एनआरसी आणि एनसीआर कायद्यामुळे जनता भयभीत झाली आहे. यामुळे समाजाच्या मोठ्या वर्गाला रस्ता दाखवण्याची गरज आहे. समाजातील मोठ्या वर्गात नाराजी आहे. या यात्रेने महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि देशाचे संविधान वाचविण्यासाठी मदत होऊ शकते. हा शक्तीपूर्ण संघर्ष आहे. त्यासाठीची जबाबदारी यशवंत सिन्हा यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांचे देशभरातील अनेक प्रतिनिधी त्यांच्या सोबत येतील. मोदी सरकारने उचललेले पाऊल हे देशाची फाळणी करणारे आहे. त्यामुळे समाजातील सर्व वर्गात एकता निर्माण करावी लागणार आहे. ज्या ताकदीवर यांनी हे कायदे आणलेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे. विविध ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये हे लोक हुकूमशाही, हल्ले करून एक दमननीती आणू पाहत आहेत. जेएनयूमध्ये जो प्रकार झाला त्यातून देशातील तरुणांच्या मनाला घाव बसला आहे. देशात बदल आणण्यासाठी महात्मा गांधी यांचा शांतीचा संदेश आणि देशातील समता कायम ठेवण्यासाठी लक्ष देण्यासाठी सिन्हा यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. त्यांचे मी स्वागत करतो, असे पवार म्हणाले.

दरम्यान, ॲड. प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी सहभागी झालो आहे. एका प्रकारचे हे युद्ध आहे. ते शांततेने लढावे लागेल. संघ आपली सामाजिक व्यवस्था आणू पाहत आहे. हा लढा आता राजकीय स्तरावर लढला पाहिजे, असे मला वाटते.

ABOUT THE AUTHOR

...view details