महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशात मोदी विरोधी वातावरण - एकनाथ गायकवाड - loksabha

मुंबईचे माजी महापौर व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी, शिवसेना - भाजप युती सरकारने जनतेला मागील निवडणुकीत खोटी आश्वासने दिली व फसवणूक केली. विकासाच्या नावावर दहशतवाद, धर्मांधता पसरवण्याचे काम केले. सुरक्षिततेच्या नावाखाली भ्रष्टाचार केला, असा आरोप केला.

देशात मोदी विरोधी वातावरण - एकनाथ गायकवाड

By

Published : Apr 8, 2019, 7:43 AM IST


मुंबई -मोदी हे काहीच कामाचे नाहीत, ही बाब मतदारांच्या लक्षात आली आहे. त्यांची ५६ इंचाची छाती संपली आहे. सध्या देशात मोदी विरोधी वातावरण आहे, असे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नवाब मलिक, वर्षा गायकवाड, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

देशात मोदी विरोधी वातावरण - एकनाथ गायकवाड


मुंबईचे माजी महापौर व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी, शिवसेना - भाजप युती सरकारने जनतेला मागील निवडणुकीत खोटी आश्वासने दिली व फसवणूक केली. विकासाच्या नावावर दहशतवाद, धर्मांधता पसरवण्याचे काम केले. सुरक्षिततेच्या नावाखाली भ्रष्टाचार केला, असा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन करतानाच मुंबईत २००९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता २०१९ मध्येही काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर भारतीय लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी मोदींचा, भाजपचा पराभव करून कॉंग्रेसला, युपीएला सत्तेवर आणणे आवश्यकच आहे, असे आवाहन माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details