मुंबई- राज्यामध्ये अनाकलनीय राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली.
तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल; गडकरींच्या फडणवीसांना शुभेच्छा - देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
![तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल; गडकरींच्या फडणवीसांना शुभेच्छा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5151379-thumbnail-3x2-mum.jpg)
नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल, हा ठाम विश्वास आहे.' असे त्यांनी म्हटले आहे.