महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाशी लढणाऱ्या सफाई कामगारांना नोटांचा हार घालून केला सत्कार - सफाई कर्मचारी मुंबई

मुंबई बंद असतानाही सफाई कामगार कामावर येऊन मुंबई स्वच्छ ठेवत आहेत. याची दखल घेत माटुंगा येथील जीएसीबी गणेशोत्सव मंडळाकडून सफाई कामगारांच्या गळ्यात प्रत्तेकी एक हजार रुपयांचा हार घालून सत्कार करण्यात आला.

कोरोनाशी लढणाऱ्या सफाई कामगारांचा नोटांचा हार घालून सत्कार
कोरोनाशी लढणाऱ्या सफाई कामगारांचा नोटांचा हार घालून सत्कार

By

Published : Apr 9, 2020, 12:03 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अशावेळी आरोग्य कर्मचारी रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न करत असताना मुंबई स्वच्छ ठेवण्याचे काम पालिकेच्या सफाई कामगारांकडून केले जात आहे. मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या या सफाई कामगारांच्या गळ्यात 1 हजार रुपयांचा हार घालून सत्कार करण्यात आला आहे. माटुंगा येथील जीएसीबी गणेशोत्सव मंडळाकडून हा सत्कार करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉक डाऊन दरम्यान मुंबईमधील कचरा काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबईत रोज 7 हजार मॅट्रिक टनहुन अधिक कचरा निर्माण होतो. हा कचरा साफ करून डम्पिंगपर्यंत नेण्याचे काम पालिकेचे सफाई कामगार करतात. शहरात जेव्हा रोगराई पसरते तेव्हा शहर स्वच्छ असणे गरजेचे आहे.

शहर स्वच्छ नसेल तर रोगराई आणखी मोठ्या प्रमाणात पसरू शकते. त्यामुळे, मुंबई बंद असतानाही सफाई कामगार कामावर येऊन शहर स्वच्छ ठेवत आहेत. याची दखल घेत माटुंगा येथील जीएसीबी गणेशोत्सव मंडळाकडून सफाई कामगारांच्या गळ्यात प्रत्तेकी एक हजार रुपयांचा हार घालून सत्कार करण्यात आला. प्रत्येक हारामध्ये 50 रुपयांच्या 11 नोटा आणि फुलांचा हार करार्मचार्यांच्या गळ्यात घालण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details