मुंबई :G २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असून पुढील वर्षी ही परिषद भारतात होत आहे. या निमित्ताने देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईमध्ये G20 परिषदेच्या निमित्ताने १३ ते १६ डिसेंबर कालावधीमध्ये पहिली बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी जगभरातून या परिषदेचे सदस्य येणार असून त्यांच्या स्वागतासाठी मुंबई शहर सजलेले असताना हे सदस्य मुंबईतील बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंह सफारीचा आनंद घेणार (G20 members will enjoy lion safari) आहेत.
सिंहाची जोडी उद्यानात रमली :मागच्याच आठवड्यात गुजरातमधून आणलेल्या सिंहाच्या जोडीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. उद्यानात सोडल्यानंतर आता या जोडीला एक आठवडा झाला. त्यामानाने ही जोडी या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे परिचित झाली असून आता त्या वातावरणाशी एकरूप झालेली दिसून येत आहे. म्हणून आता बऱ्याच अवधीपासून बंद असलेली सिंह सफारी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. G२० चे सदस्य या सिंह सफारीचा आनंद लुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टिकोनातून येथे मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात येत (lion safari in National Park) आहे.
सिंह सफारी :संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १९७५-७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे महसुलात सुध्दा मोठी वाढ झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. येथे उपस्थित असलेल्या एकमेव सिंहाचे वयाच्या १७ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे येथे एकही सिंह शिल्लक राहिला नव्हता. आता गुजरातमधील सक्कर बाग प्राणी संग्रहालयातील आशियाई सिंहाची ही जोडी नॅशनल पार्कमध्ये दाखल झाल्या कारणाने या नॅशनल पार्कची शोभा अजून वाढली असून येथे बंद झालेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार (lion safari in National Park in Mumbai) आहे.
उद्यानाचे वैशिष्ट्य :संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास चौथ्या शतकापासूनचा मोठा इतिहास आहे. त्याचे मूळ नाव कृष्णागिरी लेणी किंवा कान्हेरी लेण्यांमधून मिळालेले कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान असे होते. या उद्यानात ब्रिटिश सरकारने १८७० मध्ये बांधलेले तुळशी आणि विहार तलाव देखील आहेत. हे तलाव मुंबई शहराला पिण्याचे पाणी पुरवतात. १९५० मध्ये कृष्णागिरी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना मुंबई राष्ट्रीय उद्यान कायद्यांतर्गत करण्यात (National Park in Mumbai) आली.
उद्यान नोंदणीकृत :सुरुवातीला या उद्यानाचे क्षेत्रफळ फक्त २०.२६ चौरस किलोमीटर होते. नंतर १९६९ मध्ये दुग्धविकास मंडळाची अतिरिक्त २०७६ हेक्टर जमीन राष्ट्रीय उद्यानात जोडली गेली. आज हे १०० चौरस किमीपेक्षा जास्त जंगलाने व्यापलेले आहे. जे मुंबईच्या भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास २० टक्के आहे. आतापर्यंत पक्षांच्या २५४ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या ४० प्रजाती, सरपटणाऱ्या आणि उभयचरांच्या ७८ प्रजाती, फुलपाखरांच्या १५० प्रजाती आणि वनस्पतींच्या १३०० प्रजाती या राष्ट्रीय उद्यान नोंदणीकृत आहेत. त्यात वाघ आणि सिंह देखील आहेत. जे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. येथे बटरफ्लाय गार्डन, टॉय रेल्वे, नेचर ट्रेलस, कॅम्पिंग, हेरिटेज वॉक व इत्यादी उपक्रम उपलब्ध असून ते वर्षभर पर्यटकांना आकर्षक करतात.