महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Shinde in Clean-Up Drive: नागरिकांनो! पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी दररोज एक मिनीट वेळ द्या, मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन - जी20 मीटिंग

G20 ची तिसरी पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची (ECSWG) बैठक होणार आहे. ही बैठक 21 मे ते 23 मे दरम्यान होणार आहे. या बैठकीचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री शिंदेंनी क्लीन-अप ड्राईव्हमध्ये सहभाग घेतला होता. मुंबईतील जूहू बीचवरील क्लीन-अप ड्राईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव प्रविण दराडे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी उपस्थित होते. आयुष्यातील प्रत्येक कार्य आपला पर्यावरणपूरक असायला,असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून पोहोचावा,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : May 21, 2023, 12:57 PM IST

मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता आहे. स्वच्छता अभियान एक लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ देवून स्वत: जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचा क्लीन-अप ड्राईव्हमध्ये सहभाग : G20 ची तिसरी पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची (ECSWG) बैठक होणार आहे. ही बैठक 21 मे ते 23 मे दरम्यान होणार आहे. या बैठकीचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री शिंदेंनी क्लीन-अप ड्राईव्हमध्ये सहभाग घेतला होता. मुंबईतील जूहू बीचवरील क्लीन-अप ड्राईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव प्रविण दराडे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी उपस्थित होते. शाश्वत आणि पर्यावरणपूरक नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणं" हे प्राधान्य केंद्रस्थानी आलं आहे. तिसरी ECSWG अर्थात "पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची" बैठक २१-२३ मे दरम्यान होत आहे. हा कार्यक्रम जूहू बीच, मुंबई येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहभागी होणारे जी20चे प्रतिनिधीसुद्धा सहभागी होणार आहेत. दरम्यान, या बैठकीत भारतीय किनारी राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर जी-20 देशांचा सहभाग आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : मुंबईतील जुहू बीचवर क्लीन-ड्राईव्हमध्ये सहभाग घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई हे गतिशील आणि देशाचे ग्रोथ इंजिन असलेले शहर आहे. संत ज्ञानेश्वर यांनी मातृभूमी संरक्षणाचा संदेश दिला आहे. मानवी जीवनासाठी ही मातृभूमी वरदान असून आपण त्याचे रक्षणकर्ते आहोत. आयुष्यातील प्रत्येक कार्य आपला पर्यावरणपूरक असायला पाहिजे.असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून पोहोचावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनआंदोलन बनले आहे. देशातील प्रत्येक गाव, खेडे, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्वच्छतेसाठी आता लोकचळवळ उभी करून मोठ्या प्रमाणात आता लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी२० चे यजमानपद भारताला मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असल्याने राज्य शासनाला केंद्राकडून चांगलेच सहकार्य नेहमी मिळत आहे. राज्याला यातून विकासाकडे नेण्याचा सरकार म्हणून प्रयत्न आहे,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचा बीचवरील नागरिकांशी संवाद : ‘जी२० मेगा बीच क्लीन अप’ मोहिमेदरम्यान जुहू बीचवर आलेल्या नागरिकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. बीच स्वच्छ आहे ना ? कोणत्या सुधारणा करायला हव्यात, असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारले. आम्ही रोज याठिकाणी येतो. स्वच्छता या ठिकाणी कायम राहावी, असे नागरिकांनी सांगितले. तुमच्या काही सूचना असतील तर त्या नक्की कळवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

नागरिकांनी पर्यावरणासाठी एक मिनीट दिला पाहिजे. नागरिकांच्या सहभागामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल आणि त्याबाबत जनजागृती होईल. 'हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हे आवश्यक आहे,'- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज रविवारी देशभरात एकाच वेळी ३५ ठिकाणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावरील मोहिमेत G20 देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते, असेही ते म्हणाले. दरम्यान आजपासून मुंबईत सुरू होणारी G20 ची तिसरी (ECSWG) बैठक निळ्या अर्थव्यवस्थेच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करेल, असे अधिकाऱ्यांनी आधी सांगितले.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut News: दोन हजाराचे बंडल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे असतील- संजय राऊत
  2. Deepak Kesarkar News: खुशखबर! मराठी तरुणांना मिळणार आता जर्मनीत रोजगार- दिपक केसरकर

ABOUT THE AUTHOR

...view details