मुंबई- एसटी महामंडळाच्या बस स्थानकांचे कायापालट करण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प महामंडळाने हाती घेतला आहे. यासाठी 2018-19 या वार्षिक कालावधीसाठी 40 कोटी रुपयांचा निधी महामंडळाला परिवहन विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दयादीन झालेली बसस्थानकांचे 'रुपडे' पालटणार आहे.
एसटी बसस्थानकांचे 'रुपडे' पालटणार; नविन बांधकामासाठी ४० कोटीचा निधी मंजूर
एसटी महामंडळाच्या बस स्थानकांचे कायापालट करण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प महामंडळाने हाती घेतला आहे. यासाठी 2018-19 या वार्षिक कालावधीसाठी 40 कोटी रुपयांचा निधी महामंडळाला परिवहन विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची छोटेखानी प्रतिक्षालयात मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत एसटी महामंडाळाने या बस स्थानकाचे नव्याने बांधकाम करत मोठे बसस्थानक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार प्रशस्त प्रतिक्षालय, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह, संगणकीयकृत आरक्षण कक्ष, प्रवाशी-कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ-शुद्ध पाणी पुरवठा अशा अनेक गोष्टींचा समावेश नव्याने उभारण्यात येणाऱ्या बस स्थानकांमध्ये पाहायला मिळेल. यापूर्वी मुंबईत दादर-पुणे स्टेशन या मार्गावरील हिरकणी बस स्थानक प्रवाशांसाठी अशाप्रकारे खुले करण्यात आले आहे.