मुंबई - मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायकाकडून आता अवघ्या 10 रुपयामध्ये सुरू असलेल्या शिवभोजन थाळीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येणार असल्याचा निर्णय आज (मंगळवारी) श्री सिद्धिविनायक विश्वस्त न्यास मंडळाकडून घेण्यात आला, अशी माहिती सिद्धिविनायक न्यास मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाकडून शिवभोजन थाळीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी हेही वाचा -बिहार विधानसभेने मंजूर केला 'एनआरसी'विरोधी ठराव..
सिद्धिविनायक न्यास मंडळ हे नेहमीच दान पेटीचा उपयोग माणसाच्या मदतीसाठी करत असते, याच उद्देशाने हा निर्णय आज श्री सिद्धिविनायक न्यास मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शिवभोजन थाळीला प्रसादाच्या रूपाने हातभार लावता यावा यासाठी 5 कोटी रुपयांचा चेक लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
हेही वाचा -भारतीय उद्योगांनी अमेरिकेत विस्तार करावा; डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा