महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bollywood Celebrity Suicide : मागील तीन वर्षात 'या' सेलिब्रिटींनी केल्या आत्महत्या - Sushant Singh Rajput

अभिनेत्री तुनिषा शर्माने ( Actress Tunisha Sharma ) शनिवारी वसई येथील सेटवर आत्महत्या ( Tunisha Sharma suicide case ) केली. त्यानंतर गेल्या 3 वर्षांत आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेल्या कलाकारांची चर्चा सुरु झाली. चित्रपट, टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी तरुण वयात आत्महत्येसारखे ( Bollywood celebrity committed suicide ) पाऊल उचलले आहे. कोण आहे ते सेलिब्रेटी जाणून घेऊया, तसेच अशा घटना रोखण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे ( Psychiatrist Rajendra Barve ) यांनी काय मार्गदर्शन केले ते देखील जाणून घ्या

Bollywood Celebrity Suicide
'या' सेलिब्रिटींनी गेल्या ३ वर्षांत संपवले आयुष्य

By

Published : Dec 26, 2022, 9:35 PM IST

Updated : Dec 27, 2022, 2:26 PM IST

'या' सेलिब्रिटींनी गेल्या ३ वर्षांत संपवले आयुष्य

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने ( Actress Tunisha Sharma ) शनिवारी वसई येथील सेटवर आत्महत्या ( Tunisha Sharma suicide case ) केली. तुनिषाच्या आत्महत्येची बातमी समोर येताच, गेल्या 3 वर्षांत आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेल्या अमुक अमुक सेलिब्रिटींच्या ( Bollywood celebrity committed suicide ) नावाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. या यादीत तुनिषा शर्मापासून बॉलिवूड सुपरस्टार सुशांत सिंग राजपूतपर्यंत ( Sushant Singh Rajput Suicide Case ) अनेक प्रसिद्ध कलाकारांची नावे आहेत. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचा मृत्यू चाहत्यांसाठी अजूनही एक गूढच आहे. कधी, कसे, काय झाले. कोणालाच काहीही माहिती नाही.

या सेलिब्रिटींनी केली आत्महत्या -गेल्या 3 वर्षात आत्महत्या केलेल्या सेलिब्रिटींबद्दल बोलायचं झालं तर त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीचं. कुशलने 26 डिसेंबर 2019 रोजी आत्महत्येद्वारे जगाचा निरोप घेतला होता. यानंतर १४ जून २०२० रोजी हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले. सुशांतच्या मृत्यूचा मुद्दा बराच काळ चर्चेचा विषय बनला आहे. अजूनही सुशांतची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आजच कूपर रुग्णालयातील कर्मचारी असल्याचं सांगत रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

सुशांतनंतर 4 ऑगस्ट 2020 रोजी अभिनेता समीर शर्मा, 12 नोव्हेंबर 2020 रोजी आसिफ बसरा, 15 मे 2022 रोजी बंगाली अभिनेत्री पल्लवी त्याचबरोबर 15 ऑक्टोबर रोजी बंगाली मॉडेल बिदिशा दे मुझुमदार आणि वैशाली ठक्कर या कलाकारांनी आपलं आयुष्य आत्महत्या करून संपवलं. या सर्व सेलिब्रिटींच्या मृत्यूमध्ये एक गोष्ट समान होती की त्यांनी गळफास लावून घेतला होता आणि त्यांचे मृतदेह लटकलेले अवस्थेत आढळले.

बालिकावधू फेम प्रत्युषा बॅनर्जीनेही आत्महत्या केली होती - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालिकावधू फेम प्रत्युषा बॅनर्जीने सहा वर्षांपूर्वी 1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रत्युषा बॅनर्जीने अशा प्रकारे मृत्यूला मिठी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. प्रत्युषाच्या आत्महत्येचे प्रकरण खूप चर्चेचा विषय बनले होते. प्रत्युषा बॅनर्जीने गळफास लावून जगाचा निरोप घेतल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत आता आत्महत्येद्वारे जीव गमावलेल्या या सेलिब्रिटींच्या यादीत टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचे नावही सामील झाले आहे.

काय सांगतात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे ? - मीडिया आणि शो बिझनेस अतिशय कॉम्पिटिटिव्ह असतात. खूप खूप जवळची नाती तयार होतात आणि काही वेळेला नाती ही शोषणावर आधारलेली असतात. त्यामुळे खरी खरी मैत्री, खरेखुरे प्रेम संबंध त्यांच्यामध्ये निर्माण होतात, मात्र जपले जातात असं नाही. या गोष्टीचा अतिशय तणाव येऊ शकतो. कारण आपण तरुण असतो आणि पुरेसा सपोर्ट आपल्या फॅमिलीकडून, आपल्या लोकांकडून मिळतोच असं नाही. त्यामुळे अशा मंडळींमध्ये पटकन उदास वाटणे आणि आत्महत्या करावीशी वाटणे असं होतं. प्रतारणा झाल्यासारखं वाटणं आणि बोलायला कोणी नसत, मोकळेपणा नसतो. अशा लोकांसाठी एक सिस्टीम तयार झाली पाहिजे. तिथे त्यांना पुरेसा सपोर्ट मिळू शकेल, अनॉनिमस कॉल्स करण्याची संधी मिळाली पाहिजे. तरच अशा प्रकारचे अपघात आपण टाळू शकतो असं मला वाटतं. तसेच लवकरात लवकर आपण जितकी ट्रीटमेंट करू, तितकं लवकर आपण यातून मोकळं होऊ शकतो असं मार्गदर्शन मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे ( Psychiatrist Rajendra Barve ) यांनी ई टिव्ही भारतशी बोलताना केले आहे.

Last Updated : Dec 27, 2022, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details