महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Death Of A Youth : कुत्र्यासोबत खेळण्या वरुन वाद, तरुणाचा मृत्यू महिला गंभीर - कूपर रुग्णालय

मुंबईतील नेहरुनगर परिसरात कुत्र्यासोबत खेळण्या मुळे झालेल्या भांडणातून (playing with a dog) 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला ( Death of a youth) आहे. तर त्याच्या आईची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

By

Published : Jun 2, 2022, 10:18 PM IST

मुंबई:सूरजच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजची आई तिच्या 3 वर्षाच्या नातवासोबत घराबाहेर बसली होती. तेव्हा मुले शेजारी बसलेल्या कुत्र्याशी खेळत होते. (playing with a dog) तेवढ्यात 55 वर्षीय शेखर नायर तेथे आला आणि मुलांना शिवीगाळ करु लागला. त्यावेळी आईचे शेखर सोबत भांडण सुरू होते, यादरम्यान मुलगा सूरज कनोजियाही तिथे आला. यावेळी वाद वाढला आणि शेखरने आई आणि सूरजवर चाकूने हल्ला केला आणि पळून गेला.



घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आई आणि मुलगा दोघांनाही कूपर हॉस्पिटलमध्ये (Cooper Hospital) नेले गेले. सूरज कनोजियाला उपचारापूर्वी मृत्यू (Death of a youth) घोषित केले तर सूरजची आई देखील जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपी शेखर नायर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सध्या शेखरची चौकशी सुरु असून पीडित कुटुंबियांनी आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेने परिसर हादरुन गेला असून सूरजच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details