मुंबई: नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट सहाय्यक प्राध्यापक म्हणून भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांची योग्यता निश्चित करण्यासाठी 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत आयोजित केली जाईल, अशी घोषणा युजीसीने केली. ही परीक्षा 57 विषयांची संगणक आधारित चाचणी असेल. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, UGC ने NTA ला UGC-NET आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ही चाचणी भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.
वेळापत्रक जाहिर:देशभर लाखो विद्यार्थी युजीसीच्या नेट परीक्षेसाठी अर्ज करतात आणि मेहनत करून ही परीक्षा देत असतात. डिसेंबर 2022 मध्ये ज्यांनी या संदर्भातील अर्ज केलेला आहे. त्या संदर्भातील पहिल्या टप्पासाठी एकूण 57 विषयांसाठी या परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षा यावर्षीच्या म्हणजेच फेब्रुवारी 21 व 22 आणि 23 तसेच 24 फेब्रुवारी 2023 या काळामध्ये होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना ही जारी केली आहे. तसेच याबाबतचं शहरांसाठीच परीक्षा केंद्र कुठे असणार यांचे संपूर्ण वेळापत्रकासाठी उमेदवारांनी यूजीसी नेट या संकेतस्थळावर किंवा एनटीए च्या संकेतस्थळावर जाऊन याबाबतची अधिकृत माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे कोणत्या शहरांसाठी कुठे केव्हा परीक्षेचे वेळापत्रक नेमक काय आहे. त्याची नेमकी विश्वासार्ह माहिती प्रत्येक उमेदवाराला प्राप्त होऊ शकेल.