महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॅप्टन दीपक साठे यांच्या मित्र परिवाराने जागविल्या आठवणी

केरळमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात वैमानिक असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक साठे यांचा मृत्यू झाला. एअर इंडीयात जॉईन करण्याआधी हवाई दलात ते लढाऊ वैमानिक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यावर एअर इंडियात ते रुजू झाले. त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या मित्रपरिवाराला धक्का बसला आहे.

Friends reaction on Wing Commander deepak sathe death
कॅप्टन दिपक साठे यांच्या मित्र परिवाराने जागविल्या आठवणी

By

Published : Aug 8, 2020, 3:49 PM IST

Updated : Aug 8, 2020, 3:56 PM IST

मुंबई - केरळमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात वैमानिक असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र दिपक साठे यांचा मृत्यू झाला. एअर इंडीयात जॉईन करण्याआधी हवाई दलात ते लढाऊ वैमानिक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यावर एअर इंडियात ते रुजू झाले. त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. दीपक साठे यांच्या आठवणी त्यांच्या मित्र परिवाराने ईटीव्ही भारतकडे जागवल्या.


कॅप्टन दीपक साठे हे उत्कृष्ट पायलट होते. ते अतिशय मनमिळावू होते. ते एक मेहनती पायलट होते. एअरफोर्सनंतर ते एअर इंडियामध्ये कार्यरत होते. यंत्रणेतील बारकावे त्यांना माहीत होते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता मात्र, त्यातून ते सावरले होते, असे सेवानिवृत्त विंग कमांडर कमलदीप यांनी सांगितले. माझे नातेवाईक इथे राहतात. जेव्हा मी इथे यायचो. तेव्हा ते मला भेटायचे. ते मनमिळावू स्वभावाचे असल्याचे शरद जोशी यांनी सांगितले.

कॅप्टन दिपक साठे यांच्या मित्र परिवाराने जागविल्या आठवणी
कॅप्टन दीपक हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. चांदीवली येथील नहार भवन येथे वास्तव्यास होते. ते घरी असत तेव्हा सकाळ आणि संध्याकाळ परिसरातील बागेत फिरायला येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत इमारतीमधील रहिवासीसुद्धा असत. आज अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला असून, भावना व्यक्त केल्या आहेत. ते खूप शांत स्वभावाचे होते. नेहमी मला भेटायला येत असत. बराच वेळ माझ्याशी बोलायचे. मध्येच एखादा विनोद करायचे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे. चार दिवसांपूर्वीच मी त्यांना भेटलो होतो, असे त्यांचे मित्र दयानंद जाधव यांनी सांगितले.
Last Updated : Aug 8, 2020, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details