महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Governor Ramesh Bais : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करावा; राज्यपाल रमेश बैस - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण पार पडले. ने मजसी ने मातृभूमीला आणि जयस्तुते जयस्तुते या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजे, असे विधान या कार्यक्रमात राज्यपाल यांनी केले आहे.

Governor Ramesh Bais
राज्यपाल रमेश बैस

By

Published : May 22, 2023, 10:23 AM IST

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे विधान राज्यापाल रमेश बैस यांनी केले आहे. राज्यपाल बैस हे शौर्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

या दोन कवितांचा समावेश अभ्यासक्रमात करावा: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण पार पडले. या कार्यक्रमात त्यांनी सावकर यांच्या न मजसी ने मातृभूमीला आणि जयस्तुते जयस्तुते या कविता शालेय अभ्यासाक्रमात आल्या पाहिजेत, असे विधान केले. सावरकरांच्या स्मृती ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनले पाहिजे. तसेच नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचे भव्य स्मारक बनवण्याची गरज असल्याचेही बैस यावेळी म्हणाले. सावरकरांची जयंती 28 मे रोजी साजरी केली जाणार आहे. सावरकरांच्या जयंतीचा दिवस स्वातंत्र्यीवर सावरकर गौरवदिन साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. दरम्यान याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती बैस यांनी या कार्यक्रमात दिली आहे.

यांना मिळाला शौर्य पुरस्कार :राज्यपाल बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावर्षी शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ राणे, विज्ञान पुरस्कार अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार अभिवक्ता प्रदीप परुळेकर यांना मिळाला आहे.

सावरकरांविषयी काय म्हणाले बैस : सावरकर यांचे कार्य महान आहे. सावरकर हे व्यक्ती नाहीत तर विचार आहेत. आपण सावरकरांचे वेगवेगळ्याप्रकारे वर्णन करू शकतो. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान मोठे आहे. काहीवेळा त्यांच्याविरोधात लिहिले गेले पाहिजे, पण सगळे विसरुन आपण त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. सावरकर हे चांगले साहित्यिक होते. सावरकरांनी पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचे वर्णन केले आहे.

हेही वाचा -

  1. Jayant Patil : जयंत पाटील यांची आज होणार ईडी चौकशी; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
  2. Election War Video : साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात लढण्याचे रामराजे निंबाळकरांचे संकेत, पाहा व्हिडिओ
  3. Anil Deshmukh on Param Bir Singh : 'परमबीर सिंह हाच अँटेलिया प्रकरणाचा मास्टरमाईंड'

ABOUT THE AUTHOR

...view details