मुंबई - कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त लोअर परेल परिसरातील टॅक्सी संघटनांनी प्रवाशांसाठी लोअर परेल व वरळी नाका परिसरात कुठे मोफत फिरा, अशी प्रवाशांना निशुल्क सेवा देत आहेत तसेच रक्तदान शिबिर आयोजित केला आहे. दर दिवशी टॅक्सी चालक टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करतात परंतु कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त ग्राहकाला देवा समान समजून मनोभावे सेवा करण्यासाठी सर्वांसाठी मोफत सेवा दिली. यामध्ये एकूण 70 टॅक्सी चालक ही मोफत सेवा देत आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त वरळी, लोअर-परेलमधील टॅक्सीचालकांची मोफत सुविधा - service
टॅक्सीचालक आपल्या रोजच्या ग्राहक देवाला महाराष्ट्र व इतर कामगार दिनानिमित्त ही आगळीवेगळी सोयी सुविधा पुरवत आहेत आणि रक्तदान ही करत आहेत.
लोअर परिसरात हे टॅक्सी युनियन अख्या मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारे महाराष्ट्र आणि कामगार दिनी मोफत सेवा पुरवत आहे. ही सेवा ते सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत देणार आहेत. प्रवाशी ही या टॅक्सी चालकांनी मोफत दिलेल्या सोयीसाठी आनंदी आहेत. टॅक्सीचालक आपल्या रोजच्या ग्राहक देवाला महाराष्ट्र व इतर कामगार दिनानिमित्त ही आगळीवेगळी सोयी सुविधा पुरवत आहेत आणि रक्तदान ही करत आहेत.
या दिवशी वरळी लोअर परिसरातील हे टॅक्सी चालक दरवर्षी या दिवसानिमित अशी सुविधा यावर्षापासून दरवर्षी राबवणार आहेत, असे टॅक्सी युनियन सदस्यांनी सांगितले. प्रवाशाला कधीही प्रवासादरम्यान काही मदत लागली तर आम्ही टॅक्सी चालक तत्पर आहोत, असे ही त्यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल टॅक्सी चालक आणि प्रवासी यांचा नात्यातील अंतर ही मिटेल, अशी आशा प्रवाशांनी व्यक्त केली.