मुंबई- संकल्प सिद्धी ट्रस्ट यांचा सहयोगाने आणि खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे धारावीतील कुंभारवाड्यातील बांधवाना "इलेक्ट्रॉनिक मशीन" वाटण्यात येत आहेत. तसेच खादी ग्रामोद्योगातर्फेच१० दिवस मशीनवर कुंभार कलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
खादी ग्रामोद्योग विभागाचा उपक्रम ; धारावीत कुंभारकामासाठी वाटणार इलेक्ट्रॉनिक मशीन - खादी ग्रामोद्योग
खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे धारावीतील कुंभारवाड्यातील बांधवाना "इलेक्ट्रॉनिक मशीन" वाटण्यात येत आहेत. तसेच १० दिवस कुंभार कलेचे प्रशिक्षण मशीनवर देण्यात येणार आहे.
खादी ग्रामोद्योगाकडून धारावीत ९२ मशीन, २ बंबाईडर आणि २ चिखल मिसळायचे मशीन देण्यात येणार आहे. या मशीन चालवण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत धारावी येथे १० दिवस कुंभार काम कला प्रशिक्षण राबवले जाणार आहे. त्याला आज सुरुवात झाली. हे प्रशिक्षण २ मार्चपर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षणानंतर त्या मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.
धारावी कुंभारवाड्या सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात जशा मातीच्या वस्तू बनवल्या जातात तशाच प्रकारच्या वस्तू येथे ही बनवल्या जातात. मात्र, शासनाकडून त्यांना या व्यवसायासाठी कधीच काही मदत मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी संकल्प सिद्धी ट्रस्टच्या अध्यक्षा दिव्या ढोले यांनी खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी या बांधवांना सरकारी योजना लागू करुन प्रशिक्षण व इलेक्ट्रॉनिक मशीन कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले. या मशीन आल्यामुळे शारीरिक श्रम कमी होणार आहेत. महिलांना माती तुडवावी लागणार नाही. तसेच सारख्याच आकाराचा वस्तू लवकरात लवकर तयार करण्यास मदत होणार आहे.