मुंबई - कोरोनाच्या भीतीने काही खासगी डॉक्टरांनी तर काहींनी सुरक्षेची साधने नसल्याचे म्हणत दवाखाने-क्लिनिक बंद ठेवली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी आता 'वन रुपी क्लिनिक' हा उपक्रम पुढे आला आहे.
कुर्ला रेल्वे स्थानक येथील तिकीट खिडकीच्या बाहेर सोमवारपासून वन रुपी क्लिनिक सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे 24 तास ओपीडी सेवा दिली जाणार असून ही सेवा मोफत असणार आहे. केवळ एक रुपया शुल्क आकारत वनरुपी क्लिनिक रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळे ही सेवा मुंबईत सुरू झाल्यापासून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. अशात आता आपत्कालीन परिस्थितीत ही वन रुपी क्लिनिक नागरिकांच्या मदतीला धावून आले आहे.