मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयात शंभर टक्के मोफत रक्त उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले.
राज्यातील सरकारी रुग्णालयात मिळणार शंभर टक्के मोफत रक्त- राजेश टोपे - राजेश टोपे रक्तदान न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १३ ते २० डिसेंबर 'स्वाभिमानी सप्ताह' म्हणून साजरा कऱण्यात येणार आहे. या सात दिवसात प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे खासदार सुप्रिया सुळे
'स्वाभिमानी सप्ताहा'चे आयोजन...