मुंबई : बोरिवली येथील एका व्यक्तीची लॉटरी घोटाळ्यात 2.10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fraud with person in Mumbai through lottery). तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नुकतीच एफआयआरची नोंद केली. (Mumbai Crime News).
Mumbai Crime News : खोट्या लॉटरीद्वारे मुंबईतील व्यक्तीची 2 लाख रुपयांची फसवणूक - fraud with person in Mumbai
मुंबईच्या बोरीवली येथील एका व्यक्तीची एका अज्ञाताने 2.10 लाख रुपयांची फसवणूक केली. (fraud with person in Mumbai through lottery). लॉटरी लागल्याचे सांगून त्याने या व्यक्तीकडून पैसे उकळले.(Mumbai Crime News). वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण..
काय आहे प्रकरण? : तक्रारदाराने 2019 मध्ये एका ऑनलाइन स्टोअरमधून एक उपकरण खरेदी केले होते. दोन वर्षांनंतर त्याला पश्चिम बंगालमधून एक पत्र प्राप्त झाले, जे कथितरित्या स्टोअर मधून आले होते. पत्रात त्याची लकी ड्रॉ मार्फत निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्याला एक स्क्रॅच कार्ड मिळाले, ज्यामध्ये त्याने प्रथम बक्षीस म्हणून 10.4 लाख रुपयांची कार जिंकल्याचे उघड झाले आणि त्याला ऑनलाइन स्टोअरमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून दाखविणाऱ्या एका व्यक्तीचा कॉल आला. कॉलरने त्याला कार आपल्या नावे करण्याचा किंवा त्याच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याचा पर्याय दिला. त्याने नंतरचा पर्याय निवडला. त्यानंतर 10.4 लाख रुपयांचा दावा करण्यासाठी अज्ञात आरोपीने पीडिताला प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क म्हणून 2.10 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. रक्कम जमा करूनही, कॉलरने आणखी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली आणि तक्रारदाराला काहीतरी चुकल्याचे जाणवले आणि त्याने परतावा मागितला, जो त्याला मिळाला नाही.