मुंबई -मुंबईमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या महापालिकेकडे १ लाख १० हजार इतकाच लसीचा साठा आहे. लसीचा साठा कमी असल्याने तसेच खासगी रुग्णालयांनी लसीसाठी लागणारे पैसे भरले नसल्याने खासगी रुग्णालयातील ४० केंद्रांमधील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यासाठी पालिका तयारी करत असून त्यासाठी पालिका लसीकरण केंद्र वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
म्हणून लसीकरण बंद-
मुंबईमध्ये लसीचा तुटवडा सुरु असल्याने काही लसीकरण केंद्र बंद आहेत. याबाबत बोलताना काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना महापालिकेकडे २१ लाख ५० हजार लसींचा साठा आला होता. त्यापैकी २० लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे पालिकेकडे १ लाख १० हजार लसींचा साठा आहे. हा साठा आजचा दिवस पुरेल इतकाच आहे. यामुळे ज्या ठिकाणी लसीकरणाला गर्दी होत आहे, अशा ठिकाणीच लस देण्यात आली आहे. आज रात्री लसीचा साठा येणार आहे. हा साठा आल्यावर सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरळीत सुरु होईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
पालिकेची तयारी -