महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस; विरोधक आक्रमक - BJP3

विधानसभेत प्रश्नोत्तरे त्यानंतर लक्षवेधी आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच राज्यपालांच्या अभिभाषणावर सविस्तर उत्तर देतील.

मुंबई

By

Published : Jun 20, 2019, 11:14 AM IST

मुंबई- विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक आहेत. चौथ्या दिवसाचे कामकाजही विरोधकांच्या आक्रमणाने सुरुवात होणार आहे. विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये बुधवारी झालेल्या प्रकाराचे पडसाद आजच्या कामकाजावर पडणार आहेत.

पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस; विरोधक आक्रमक

विधानसभेत प्रश्नोत्तरे त्यानंतर लक्षवेधी आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच राज्यपालांच्या अभिभाषणावर सविस्तर उत्तर देतील. राज्यात पडलेल्या पुर्व पर्जन्य आणि दुष्काळी परिस्थितीवर सत्ताधारी पक्षाने चर्चा उपस्थित केली आहे. त्यावरही चर्चा अपेक्षित आहे, त्यानंतर विधेयके चर्चेला येऊन सभागृहाचे काम संपेल.

ABOUT THE AUTHOR

...view details