हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच 14 विद्यार्थ्यांना मणिपूमधील शिवसेना कार्यालयात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
Eknath Shinde
By
Published : May 7, 2023, 10:08 PM IST
|
Updated : May 7, 2023, 10:28 PM IST
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दंगलग्रस्त मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संवाद साधला. मणिपूर हिंसाचारात राज्यातील 22 विद्यार्थ्यांना अडकले आहेत. त्यांना प्रथम आसामला हलवले जाईल तेथून त्यांना घरी परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
14 जणांना शिवसेना कार्यालयात हलवले : त्यापैकी 14 जणांना मणिपूर येथील शिवसेना कार्यालयात हलवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मणिपूरच्या ईशान्येकडील राज्यामध्ये आदिवासी, बहुसंख्य मेतेई समुदायाच्या सदस्यांमध्ये अलीकडेच हिंसक संघर्ष सुरू झाला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 13 हजाराहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तेसच किमान 54 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पीडित विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन :मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये हिंसाचार उसळला आहे. सर्वाधिक हिंसाचार डोंगरी जिल्ह्यांमध्ये उफाळुन आला आहे. आदिवासी एकता मंचाने आयोजित केलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराचा भडका उडाला आहे. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे सरकार मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पीडित विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले.
महाराष्ट्राती 22 विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. मी त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना विकास शर्मा, तुषार आव्हाड यांच्याशी बोललो आहे त्यांना घरी परतण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. मी त्यांना घाबरू नका असे सांगितले, त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सर्व आवश्यक व्यवस्था करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मुख्य सचिवांना आदेश : राज्यातील 22 विद्यार्थी मणिपूरमधील वेगवेगळ्या तंत्रज्ञान संस्थांमध्ये शिकत आहेत, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विद्यार्थांची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सौनिक, इतर राज्य अधिकाऱ्यांशीही बोललो आहे. आम्ही सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना संपर्क साधुन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली आहे.
मणिपूरच्या प्रदेशाअध्यक्षांना सुचना : विद्यार्थ्यांना प्रथम आसामला हलवले जाईल. नंतर तेथून त्यांना घरी परतण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री सरमा यांच्याशी संपर्क साधल्याचे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे मणिपूर प्रदेश प्रमुख एम. टॉम्बी सिंग यांच्याशीही फोनवर संपर्क साधला असून त्यांना स्थानिक पातळीवर आवश्यक ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे, असे शिंदे यांच्या कार्यालयाने सांगितले.
विद्यार्थ्यांनी शिंदे यांचे मानले आभार :आज संध्याकाळी शिंदे यांच्या कार्यालयाने सांगितले की, 14 विद्यार्थ्यांना मणिपूर येथील शिवसेनेच्या कार्यालयात हलवण्यात आले आहे. त्यांना जेवण आणि इतर आवश्यक गोष्टी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेबद्दल विचारपूस केली. यावर विद्यार्थ्यांनी शिंदे यांचेही आभार मानले, असे निवेदनात म्हटले आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना केंद्र सरकार तसेच मणिपूर सरकारशी समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. मणिपूरमधील विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना तात्काळ परत आणावे अशी मागणी त्यांनी केली आहे. ते आज बारामती शहरात आले असता पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत होते.
विद्यार्थ्यी हिंचारामुळे भयभीत :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशीही बोलून त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. एनआयटीमध्ये अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यी हिंचारामुळे भयभीत झाले होते. काही विद्यार्थ्यांनी एसएमएसद्वारे फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कर्फ्यू शिथिल :फडणवीसांनी मणिपूरच्या पोलीस महासंचालकांशी बोलून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून दंगलीमुळे मणिपूरच्या काही भागांमध्ये जाळपोळ सुरूच आहे. आज कर्फ्यू शिथिल करण्यात आल्याने हवाई लष्कराच्या मदतीने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. संपूर्ण दंगलग्रस्त राज्यात 120-125 लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच सुमारे 10 हजार सैनिक, निमलष्करी दल, केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात आल्या आहेत.