मुंबई - मुंबईतील 5 पंचतारांकित हॉटेलना उडविण्याची धमकी ईमेलच्या माध्यमातून बुधवारी देण्यात आली. यानंतर तत्काळा मुंबई पोलिसांच्या पथकाने तपासणी केली असता कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही. धमकीच्या मेलने एकच खळबळ उडाली .लीलावती हॉटेल, रामाडा , प्रिन्सेस आणि पार्क या पंचतारांकित हॉटेल्सचा यात समावेश आहे.
मुंबईतील 'या' चार फाईव्ह स्टार हॉटेलांना बॉम्बने उडविण्याची धमकी; 'लष्कर-ए-तोयबा'च्या नावाने मेल - लष्कर ए तोयबाचा मेल
मुंबईतील चार फाइव्ह स्टार हॉटेल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल लष्कर ए तोयबाच्या नावाने पाठवण्यात आला आहे.
या पंचतारांकित हॉटेलना ई-मेलच्या माध्यमातून हॉटेल मध्ये बॉम्ब ब्लास्ट करून घातपात घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्या. यानंतर तत्काळ मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाने तपासणी केली असता कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आलेली नाही. या चारही हॉटेलला आलेल्या ई-मेलमध्ये येत्या 24 तासांत हॉटेलमध्ये आतंकवादी घुसणार आहेत. यासोबत लष्कर-ए-तोयबाचाही उल्लेख करण्यात आलेला होता. तसेच हा हल्ला थांबवायचा असेल तर 100 बिटकॉईनची मागणीसुद्धा या ई-मेल मध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात धमकीचा ई-मेल पाठविणाऱ्या शोध घेतला जात आहे.
हेही वाचा -सगळंच माफ करायला लागलो तर कपडेच काढून जावं लागेल...