मुंबई : ट्रेन क्रमांक ०९०९३ मुंबई सेंट्रल भगत की कोठी स्पेशल मुंबई सेंट्रल येथून शनिवार, २१ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९.३० वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०९४ भगत की कोठी उधना स्पेशल ही भगत की कोठी येथून रविवार, २२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी उधना येथे ७.०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन सुरत, वडोदरा, रतलाम, मंदसौर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजयनगर, नसीराबाद, अजमेर, बेवार, मारवाड जंक्शन, पाली आणि लुनी स्टेशनवर दोन्ही दिशेने थांबेल. गाडी क्रमांक ०९०९३ बोरिवली आणि वापी स्थानकावरही थांबेल. या ट्रेनमध्ये AC 2-Tier, AC 3-Tier, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.
गाडी क्रमांक ०९०२१/०९०२२ वांद्रे टर्मिनस :गाडी क्रमांक ०९०२१ वांद्रे टर्मिनस भुज सुपरफास्ट स्पेशल ही बुधवार, २५ जानेवारी २०२३ रोजी वांद्रे टर्मिनस येथून १९.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.२५ वाजता भुजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०२२ भुज वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ रोजी भुज येथून १३.१५ वाजता सुटेल आणि वांद्रे टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ४.१५ वाजता पोहोचेल. या मार्गात ही ट्रेन दोन्ही दिशेने बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, विरमगाम, ध्रांगध्रा, समखियाली, भचाऊ आणि गांधीधाम स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये AC 2-Tier, AC 3-Tier, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.
गाडी क्रमांक ०९२०७/०९२०८ भावनगर स्पेशल :गाडी क्रमांक ०९२०७ वांद्रे टर्मिनस भावनगर स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ९.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भावनगरला २३.४५ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९२०८ भावनगर वांद्रे टर्मिनस स्पेशल भावनगर येथून गुरुवार, २६ जानेवारी २०२३ रोजी १४.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा जंक्शन, नडियाद जंक्शन, अहमदाबाद जंक्शन, सुरेंद्रनगर गेट, बोटाड जंक्शन, ढोला जंक्शन, सोनगढ आणि भावनगर पारा स्टेशनवर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये AC 2-Tier, AC 3-Tier, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.