महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपमध्ये मेगा भरती, आज ४ विद्यमान आमदार करणार भाजप प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज राष्ट्रवादीचे ३ आणि काँग्रेसच्या एक आमदार भाजप प्रवेश करणार आहे.

By

Published : Jul 31, 2019, 8:30 AM IST

आज ४ विद्यमान आमदार करणार भाजप प्रवेश

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज राष्ट्रवादीचे ३ आणि काँग्रेसचे एक आमदार भाजप प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा प्रवेश होणार आहे.

कोण करणार भाजप प्रवेश

१) शिवेंद्रराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले हे जावळी-साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तसेच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे ते बंधू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगत होत्या. आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते हातावरील घड्याळ उतरुन हाती कमळ घेणार आहेत.

२) संदिप नाईक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदिप नाईक हे सुद्धा आज भाजप प्रवेश करणार आहेत. त्यांनी कालच (मंगळवार) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे.

३) वैभव पिचड
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र आणि अकोल्याचे आमदार वैभव पिचड हे सुद्धा आज राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

४) कालिदास कोळंबकर

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसलाही पक्षांतराचे ग्रहण लागले आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तेही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

हे चारही आमदार आज मुंबईतल्या गरवारे कल्बमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठे खिंडार पाडणारे आहेत.

:

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details