महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : वाढदिवसाच्या पार्टीच्या बिलाचा वाद, दोन अल्पवयीनांसह चौघांनी केली मित्राची हत्या - d over dispute over birthday party bill

वाढदिवसाच्या पार्टीचे बिल देण्यावरून झालेल्या वादात चौघांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चौघांपैकी दोघे अल्पवयीन आहेत पोलिसांनी या प्रकरणी चौघांनाही अटक केली आहे. (birthday party bill)

Four friend kill friend
चौघांनी केली मित्राची हत्या

By

Published : Jun 6, 2023, 1:03 PM IST

मुंबई : मित्राचा वाढदिवस उत्साह आणि जल्लोषात साजरा करताना पार्टी केल्या नंतर बिलाची रक्कम वाटून घेण्यावरून झालेल्या वादात चौघांनी मिळून आपल्याच 18 वर्षीय मित्राची हत्या केल्याची घडना काहि दिवसांपूर्वी मुंबईचे उपनगर असलेल्या गोवंडी मधे समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे 10 हजार रुपयांचे बिल देण्यावरुन हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात दिलेल्या माहिती नुसार 18 वर्षीय तरूणाने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 31 मे रोजी एका ढाब्यावर पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी त्याने त्याच्या मित्रांना बोलावले होते. तेव्हा 10 हजार बिल झाले. यावेळी हे बिल शेअर करण्याचा विषय आला. पण यावरुन त्यांच्यात वाद झाला. शेवटी ज्याचा वाढदिवस होता त्याने ते सुमारे 10 हजारांचे बिल भरले कारण त्याच्या उर्वरित मित्रांनी नंतर पैसे देण्याचे मान्य केले. पीडितेने नंतर त्याच्या मित्रांकडे पैसे मागितले परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्याला धमकावल्याचीही माहिती समोर आली आहे.

हा वाद तात्पूरता मिटला असे वाटत असतानाच त्या मित्रांनी मात्र त्या घटनेचा राग मनात ठेवला. नंतर त्या चौघांनी पुन्हा वाढदिवसाच्या एक पार्टीचे आयोजन केले. त्या मित्राला या पार्टीसाठी खास निमंत्रण दिले. या चौघांनी पुन्हा पहिल्यासारखी जल्लोषात पार्टीही केली मात्र पहिल्या पार्टीच्या बिलाच्या रकमेत पैसे शेअर कराव्या लागल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्याची जाणिव त्यांनी त्याला होऊ दिली नाही. पार्टीत त्या मित्राला केक खाऊ घालता. आणि त्याच्यावर अचानक धारदार शस्त्रांनी मोठा हल्ला केला. यातच त्याचा मृत्यू झाला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की. पार्टीचे बिल वाटून घेण्याच्या कारणावरून हा वाद झाला. यात चौघांनी मिळून आपल्याच मित्राला मारले. या घटनेतील दोघे अल्पवयीन आहेत. तर मुख्य अरोपी असलेले दोघे 19 आणि 22 वयोगटातील आहेत ते उत्तर प्रदेशातील गोंडा येथे त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई गुन्हे शाखेने अहमदाबाद येथून पकडून अटक केली. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. MBBS Student Suicide : नैराश्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिले भावनिक पत्र
  2. Nashik Crime News: इन्स्टाग्रामवरील प्रेमाचा शेवट.. इमारतीवरून ढकलून मैत्रिणीची हत्या करणाऱ्या तरुणाला पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details