मुंबई :या प्रकरणीविधी संघर्ष बालकासह पियुश रमेश सोनी, 35 वर्षे, राठि कुशवाल फार्म हाऊस रोड, विजयनगर, अजमेर राजस्थान, अर्जुन महेश सोनी, 29 वर्षे, राठि सदर बाझार टाटोटी, अजमेर, राजस्थान, राजकुमार बाबुलाल सोनी, 32 वर्षे, राठि- बजरंग कॉलोनी, सटाणा बाझार, अजमेर, राजस्थान या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
6 ते 18 तारखे दरम्यान गुन्हा :तक्रारदार यांचे नाव महालक्ष्मी रामस्वामी अय्यर, वय 58 वर्षे असून त्या गृहिणी आहेत. तक्रारदार महालक्ष्मी अय्यर यांना 6 मार्च ते 18 मार्चच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्स् अप वर Global Advert Corp Official या कंपनीच्या नावे पार्टटाईम जॉबसाठी संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी Global Advert Corp Official या कंपनीच्या नावे असलेला टेलेग्राम ग्रुप जॉईन केला. नमुद टेलेग्राम ग्रुप वर त्यांना युट्युब लिंक ओपन करुन नमुद विडिओ लाईक करण्याचा जॉब-टास्क देण्यात आला. नमुद जॉब टास्क केल्यानंतर त्यांचे बँक खात्यात सुरवातीला 150/- रुपये जमा झाले. त्यानंतर 1300/- रुपये, त्यानंतर 7500/- रुपये असे पैसे टास्क पुर्ण केल्यावर त्यांच्या बँक खात्यावर जमा करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदाराना मोठा टास्क देवुन 12000/-, 25000/-, 50000/- अशा मोठ्या रक्कमा भरावयास लावुन जास्त पैसे कमवण्याचे आमिष देण्यात आले. नमुद आमिषाला बळी पडुन तक्रारदारांनी एकुण 4,32,100/- रुपये भरले परंतु त्यांना कोणतीही रक्कम परत मिळाली नाही. अश्याप्रकारे तक्रारदारांना टेलेग्राम ग्रुप टास्क फ्रॉड मध्ये 4 लाख 32 हजार 100/- रुपये भरण्यास लावुन त्यांची फसवणुक झाल्याने नमुद कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.