मुंबई -गजबजलेल्या काळाचौकी परिसरांमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबरला एका अज्ञात व्यक्तीची पाठीवर, छातीवर आणि मनगटावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली होती.
मुंबईतील काळाचौकी परिसरातील दलालाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक हेही वाचा -उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका; जन्मठेप कायम
याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. सुरूवातीला मृत व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांना अवघड जात होते. मात्र, पोलिसांनी समाज माध्यमांच्या मदतीने मृत व्यक्तीची ओळख पटवली. हत्या झालेली व्यक्ती ही चेंबूर परिसरामध्ये राहणारी असून तिचे नाव श्यामदेव ईश्वर यादव (वय 29) असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मृत व्यक्ती ही मुंबईतील लॅमिंग्टन रोड येथे वेश्या व्यवसायात दलालाचे काम करत असल्याची माहिती सुद्धा पोलीस तपासात समोर आली आहे.
हेही वाचा -पीएमसी बँक घोटाळ्यात आरबीआयसुद्धा सहभागी; बँक ग्राहकांचा आरोप
घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी रवी महेश आनंद (वय 30) हृतिक सूनरिया (वय 19) अशा दोन आरोपींची सुरुवातीला ओळख पटली होती. हत्या केल्यानंतर हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर झाशी उत्तर प्रदेश याठिकाणी लपले असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे एक पथक या आरोपींना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये गेले होते.
हेही वाचा -दोन गटातील किरकोळ वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून उंटाची हत्या; परभणीतील घटना
स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर चौकशीमध्ये गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेले पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींची मदत करणाऱ्या सुंदरराज शेट्टी (वय 46), लीलाधर गौतम (वय 45) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अजून एका आरोपीचा शोध घेत आहेत. अटक आरोपींनी चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असल्याचे सांगीतले आहे. मात्र, ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे, त्यावरून यामागे दुसरे काही कारण आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.