मुंबई : चार अनोळखी इसमांनी गोवंडी परिसरातून फिर्यादीच्या रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसून कुर्ला परिसरात फिर्यादी यांची ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरी करून फिर्यादीला मारहाण केलेबाबत गोवंडी पोलीस ( govandi police ) ठाण्यात आयपीसी कलम ३९४,५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून चार आरोपीना अटक ( four accused arrested by govandi police ) केली आहे. ( Mumbai Crime )
Mumbai Crime : रिक्षा लुटून मारहाण करणाऱ्या ४ आरोपींना अटक - रिक्षा लुटून मारहाण करणारे आरोपी
रिक्षा लुटून मारहाण केल्याप्रकरणी ४ आरोपींना अटक गोवंडी पोलिसांनी अटक ( four accused arrested by govandi police ) केली आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी ( govandi police ) बारकाईने आणि कौशल्यपूर्ण तपास करून सलग ६५ सीसीटीव्ही कॅमेरे यांची कसून तपासणी करून चार आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. ( Mumbai Crime )
सीसीटीव्हीद्वारा गुन्हागारी उघडकीस : याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी बारकाईने आणि कौशल्यपूर्ण तपास करून सलग ६५ सीसीटीव्ही कॅमेरे यांची कसून तपासणी करून चार आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील सानपाडा येथून साई उर्फ विघ्नेश पांडेयन नाडर, वय २३ वर्षे, हेमेंद्र हरेश पटेल, वय २४ वर्षे, शानवाज अहमद सिराज अन्सारी, वय १९ वर्षे व आदित्य प्रेमानंद तेलतुंबडे, वय २१ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपिंकडून पोलीस कोठडीदरम्यान गुन्हयात चोरी केलेली रिक्षा, मोबाईल फोन व रोख रक्कम अशी संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस पथकाची कारवाई : या गुन्हयाचा तपास विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हेमराजसिंह राजपूत पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर, पोलीस निरीक्षक अनिल हिरे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमर चेडे, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील यांच्या यशस्वीरित्या कारवाई केली.