मुंबई - बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाने ( Pawan Raje Nimbalkar murder Case ) महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या खूनप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Session Court ) विशेष सीबीआय कोर्टामध्ये माफिचा साक्षीदार पारसमल जैनची ( Pardon Witness Parasmal Jain ) उलटतपासणी घेम्यात आली. आरोपी पद्मसिंह पाटील यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी घेतलेल्या उलटतपासणीत माफीच्या साक्षीदाराच्या जबाब तफावत असल्याचे आढळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) यांना त्यांचा चुलत भाऊ आणि स्थानिक काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर ( Congress leader Pawan Raje Nimbalkar murder Case) यांच्या जून 2006 मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे.
सलग दोन दिवस उलट तपासणीस न्यायालयाची परवानगीमुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Session Court ) अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात आज सुनावणी झाली आहे. माफिचा साक्षीदार पारसमल जैन ( Pardon Witness Parasmal Jain ) याच्या मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आलेले 2 जबाब आणी कोर्टातील तिसऱ्या जबाबात तफावत असल्याचे म्हटले आहे. जैन यांची दोन दिवस उलट तपासणी करण्याकरिता पद्मसिंह पाटील ( Former Home Minister Dr. Padmasinh Patil ) यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी परवानगी मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 ते 4 जानेवारी सलग दोन दिवस उलट तपासणी करण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी आता 3 जानेवारी रोजी होणार आहे.