मुंबई - गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा Mumbai Corona Update प्रसार आटोक्यात आला आहे. गेले काही दिवस १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ७ रुग्णांची Found 7 Corona Patient In Mumbai नोंद झाली असून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ३७ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी Corona Patient In Mumbai केवळ सात रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Mumbai Corona Update मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात, शुक्रवारी आढळले केवळ ७ नवे रुग्ण - कोरोनाची लेटेस्ट बातमी
चीनमध्ये कोरोनाने हाहाकार उडवल्यामुळे राज्यातही कोरोनाचा धोका वाढला आहे. मात्र मुंबईतील कोरोना Mumbai Corona Update रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. शुक्रवारी मुंबईत Found 7 Corona Patient In Mumbai कोरोनाचे केवळ 7 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा Corona Patient In Mumbai प्रसार आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचे ७ नवे रुग्णमुंबईत २३ डिसेंबरला २०८९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ७ रुग्णांची Found 7 Corona Patient In Mumbai नोंद झाली. आज आढळून आलेल्या ७ पैकी ६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. १ रुग्ण आज रुग्णालयात दाखल करण्यात आला. सध्या ६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून २ रुग्ण ऑक्सिजनवर Corona Patient In Mumbai आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार ०७४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार २९१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १,५५,९४८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी Found 7 Corona Patient In Mumbai सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४४४१ बेडस आहेत. त्यापैकी ६ बेडवर म्हणजे ०.१४ टक्के इतक्या बेडवर रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत उतार सुरूमुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार Found 7 Corona Patient In Mumbai आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात महापालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद Corona Patient In Mumbai झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात Found 7 Corona Patient In Mumbai रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे.