मुंबई - अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार ( Found 3 Passengers Corona Positive In Mumbai ) वाढल्याने विमानतळावर परदेशी प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. यामधून विमानतळावर ( Mumbai International Airport ) आलेले ३ व मुंबईत आढळून आलेले ६२ असे एकूण ६५ जणांचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान परदेश प्रवास करण्यापूर्वी ७२ तासांचा आरटीपीसीआर ( Mandatory 72 Hour Negative Report ) चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.
३ प्रवासी कोरोना बाधितमुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार अडीच वर्षानंतर काहीसा कमी झाला आहे. त्यातच आता चीन, जपान, कोरिया, अमेरिका, ब्राझिल या देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. यामुळे या देशातून मुंबई विमानतळावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहेत. स्वित्झर्लंड, मॉरिशस व लंडन या देशातून आलेल्या तीन प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली असता तिन्ही प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. हे तिन्ही प्रवासी नवी मुंबई, पुणे व गोवा येथील आहेत. ३ प्रवासी असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
७२ तासांचा अहवाल बंधनकारक मुंबईत दररोज तीन हजार कोरोना चाचण्या ( Corona Virus Test ) करण्यात येतात. तसेच मुंबई विमानतळावर दररोज १५ हजार प्रवासी येत असून त्यापैकी लक्षणे नसलेल्या दोन टक्के प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी आणि थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार चीन, जपान, कोरिया, अमेरिका, ब्राझिल, सिंगापूर, थायलँड, हाँगकाँग या देशात बीएफ ७ चा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे या देशातून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांचा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रोज दीड लाख चाचण्या करणारकोरोना आटोक्यात असल्यामुळे मुंबईत सध्या सुमारे तीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात किमान ५ ते १० कोरोनाबाधित आढळत आहेत. मात्र ‘बीएफ-७’चा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्यास महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) दररोज दीड लाख कोरोना चाचण्या करू शकेल, अशी क्षमता असल्याची माहिती डॉ. संजीवकुमार यांनी दिली.
६५ जणांचे नमुने एनआयव्हीकडे मुंबईत कोरोना बाधित ( Corona Patient In Mumbai ) आढळलेले ६२ व विमानतळावर आढळले ३ अशा एकूण ६५ बाधितांच्या घशाचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवले असून चार ते पाच दिवसात अहवाल येणार आहे. त्यामुळे या 65 जणांना नव्या कोरोनाची लागण आहे की नाही हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहितीही महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.