मुंबई- विक्रोळीतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका यांचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील सुश्रुषा रुग्णालयात तीन दिवसापासून उपचार सुरू होते. त्या कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विक्रोळीच्या माजी नगरसेविकेचा कोरोनाने मृत्यू... कर्करोगानेही होत्या त्रस्त - विक्रोली मृत्यू
दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या असल्यामुळे मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने विक्रोळीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजी नगरसेविका या कर्करोगाने त्रस्त असल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
हेही वाचा-कोरोना विषाणूवर प्रभावी प्रतिजैवक विकसित केल्याचा इस्त्रायलचा दावा
दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या असल्यामुळे मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने विक्रोळीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजी नगरसेविका या कर्करोगाने त्रस्त असल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती चाचणी पॅझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने कन्नमवार नगरमधील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू करण्यात आले. परंतु, वाढते वयोमान (वय ७७) आणि कर्करोगाने त्रस्त असल्याने मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विक्रोळीमध्ये गरजवंताना मदत करणाऱ्या नगरसेविका म्हणूनही त्या ओळखल्या जात.